शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पंकजांवर निवडणूक लढण्याची नामुष्की

By admin | Updated: April 1, 2015 01:01 IST

अंबाजोगाई : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची निवडणूक होत असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले पंकजांवर निवडणूक लढण्याची नामुष्की

अंबाजोगाई : येथील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची निवडणूक होत असून मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महिला गटात दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले. तर सर्वसाधारण गटात दहा जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज राहिले. तीन संचालक बिनविरोध निघाले असून बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे उमेदवार आहेत. मंगळवारी महिला गटात दोन जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने पंकजा मुंडे यांच्यावर निवडणूक लढण्याची नामुष्की ओढावली आहे. आठवडाभरापासून पंकजा यांची सुरू असलेली शिष्टाई अखेर अंबाजोगाईकरांनी निष्फळ ठरविली. मात्र दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी तीन संचालक बिनविरोध निघाले आहेत. अंबाजोगाईकरांनी पंकजांच्या शिष्टाईस प्रतिसाद न दिल्याने निवडणूक लढविण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. महिला गटात संगीता प्रकाश आपेट यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आता बँकेच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सदरील निवडणुकीचे कामकाज तालुका उपनिबंधक एम.एस. गौंड पाहत आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासमोर उमेदवार नसेल अशी अपेक्षा अनेकांची होती. परंतु महिला गटात त्यांच्यासमोर दोन अर्ज असल्यामुळे त्यांना आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे त्यांच्यावर आपुलकीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा आता फोल ठरत आहे. त्यामुळे एका दृष्टीने पंकजा मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक परीक्षा ठरणार आहे. यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. दोन महिला उमेदवार त्यांच्यासमोर आल्या असल्यामुळे अखेरपर्यंत या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. यात दुमत नाही. (वार्ताहर)४गेल्या तीन वर्षांपासून लांबलेल्या सहकारी बँकेच्या तसेच पतसंस्था, शेती संस्था आदींच्या निवडणुकांचा कार्यक्रम महिन्याभरापूर्वी जाहीर झाला आहे. ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे ड व क वर्गातील निवडणूका पार पडल्यानंतर आता ब आणि अ वर्गातील निवडणुका मोठ्या गतीने होत आहेत. पूर्णवादी बँक, शाहू बँक, गजानन नागरी बँक, दीनदयाळ बँक यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तालुका निबंधक कार्यालयामार्फत अर्ज स्वीकारणे, अर्जाची छाननी करणे आदी प्रक्रियांच्या तारखा संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसेच उपजिल्हा निबंधक कार्यालयात संस्थांची माहिती डकविण्यात आली आहे. ब गटामध्ये जवळपास ८३ संस्था आहेत. अ वर्गामध्ये केवळ बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता पुढील काळात सहकारी संस्थेच्या निवडणुकांचा धुराळा पहावयास मिळणार आहे. अनेक ठिकाणी गटबाजीला उधाण आले असून त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे काही सहकारी संस्था बिनविरोध काढल्या जात आहेत. सहकारी सोसायट्याही बिनविरोध निघत असल्याचे गेल्या आठ दिवसांच्या कालावधीत पहावयास मिळाले. काही ठिकाणचे वादाचे किरकोळ प्रकार वगळता बिनविरोधला प्राधान्य दिले जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे.