शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगा दयाघना गुणनिधाना भवसिंधू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:29 IST

येथील बाहेरील नाथ मंदिरात ह.भ.प. छैया महाराज गोसावी, ह.भ.प. विनित महाराज गोसावी यांनी एकनाथी भागवत पारायण सप्ताह आयोजित केला होता. त्यानिमित्तानं संत एकनाथांचे तेरावे वंश पं.गिरीश गोसावी आणि पं. मिलिंद गोसावी यांचा अभंगवाणी कार्यक्रम आयोजित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : येथील बाहेरील नाथ मंदिरात ह.भ.प. छैया महाराज गोसावी, ह.भ.प. विनित महाराज गोसावी यांनी एकनाथी भागवत पारायण सप्ताह आयोजित केला होता. त्यानिमित्तानं संत एकनाथांचे तेरावे वंश पं.गिरीश गोसावी आणि पं. मिलिंद गोसावी यांचा अभंगवाणी कार्यक्रम आयोजित केला होता.शास्त्रीय संगीताचा वारसा लाभलेले पंडितजी रंगमंचावर उपस्थित होऊन रागराज-यमन कल्याणवर आधारित ‘रामकृष्ण हरि’ चा गजर सुरू झाला. शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे श्रवणीय घटक संयमित वापरून अतिशय रंजकपणे सादरीकरण झाले. एकनाथ महाराजांची समाधी असलेला परिसर आणि वारकºयांनी तुडूं’ब भरलेलं सभागृह आणि सुरेलपणे सादर झालेले ‘जय जय राम कृष्ण हरि’ मुळे वातावरण भक्तीमय झालं.मिलिंद गोसावींनी किरवाणी रागात नाथांचा अभंय ‘पाहता समरचणाची शोभा। अवघा जगी विठ्ठल उभा’ घेतला, सुंदर रागविहार, छोट्या -छोट्या ताना, हरकतींनी अभंग सजवला. परंपरेनुसार रुपाचा अभंग घ्यावा लागतो, त्या नंतर पं.गिरीश गोसावींनी मिश्र मालकंस रागावर आधारित, संत एकनाथ रचित ‘भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा’ हा बोधपर अभंयग सादर केला. राग मालकंसासोबत, कौशी कानडा, चंद्रकंस अशा रागांच्या छटा त्यांनी कौश्ल्यपूर्ण घेतल्यामुळे अभंग अतिशय परिणामकारक झाला.या अभंगानंतर पं. गिरीशजींनी ज्ञानदेवांच्या ‘वासुदेव’’ सादर केला. देसकार आणि भूप रागांच्या छटा असलेली ही रचना ‘घुळघुळा वाजती टाळ’’ असे शब्द घेवूृन सजली होती.भारदस्त आवाज आणि आवाजातील चपळता यांचा सुरेख संगम असलेले पंडितजी ही रचना गातांना अधिक खुललेले जाणवले.अशा भक्तीरसप्रधान वातावरणातच पंडितजींनी भैरवी राग छेडला. भैरवी रागात सर्व स्वरांचा वापर करण्याची मुभा शास्त्रानं दिलेली आहे. याचा फायदा घेत सर्व सूरांचा वापर करून भैरवीचं मूळ रूप प्रभावीपणे दाखवत सुंदर लयकारी आणि द्रुत धुमाळी तालात संत निळोबा महाराजांचा अभंग ‘‘पांडुरंगा दया घना।ऋणानिधाना भवसिंधू’’ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. संयोजकांच्या हस्ते तबला वादक उदय नाईक मुंगीकर, हार्मोनियमची साथ देणारे गणेश अण्णासाहेब आव्हाड यांचा सत्कार करण्यात आला.