शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पंचायत समित्यांच्या कारभाराची झाडाझडती

By admin | Updated: July 2, 2014 00:27 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी सुरू केली आहे

संजय कुलकर्णी, जालनाजिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी सुरू केली आहे. महिनाभरात कारभार न सुधारल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सीईओंनी दिला आहे.ग्रामीण भागाच्या विकास कामांचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांमधील कारभार विस्कळीत असल्याचा प्रकार मागील काही दौऱ्यांमध्ये खुद्द सीईओंच्या निदर्शनास आला होता. कृषी, समाजकल्याण, पाणीपुरवठा या विभागाअंतर्गतच्या वाटप करावयाचे साहित्य, इंदिरा आवास योजनेअंतर्गतच्या निर्धूर चुली, ब्लँकेटचे वाटप अद्यापही झालेले नाही. मार्च २०१४ पूर्वीपासून हे साहित्य पंचायत समित्यांकडे पडून आहे. गेल्या महिन्यात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे साहित्य वाटप झाला नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सीईओंना या बाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे पंचायत समित्यांमधील अन्य कामकाजासंबंधीही काही तक्रारी सीईओंना प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सीईओ देशभ्रतार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली १२ विभागांमधील २४ जणांचे एक पथक तयार केले आहे. पथकात तपासणी अधिकारी व नियंत्रक अधिकाऱ्यांसह अन्य २२ जणांचा सहभाग आहे. गेल्या महिनाभरात चार पंचायत समित्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. या पथकांमार्फत जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये ३० व ३१ मे रोजी बदनापूर, ५ व ६ जून रोजी जालना, ११ व १२ जून रोजी घनसावंगी, १७ जून रोजी मंठा (येथील तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही) तसेच भोकरदन येथे २६ व २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तर उर्वरित पंचायत समित्यांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींची खातरजमा विभागप्रमुखांकडून केली जात आहे. अपूर्ण अभिलेखे, कामे पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. महिनाभरात ही कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सीईओ देशभ्रतार यांनी दिला आहे.शंभर मुद्यांवर होतेय पंचायत समित्यांची तपासणीही दप्तर तपासणी शंभर मुद्यांवर आधारित आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवापुस्तिका अद्ययावत करणे, संगणक हाताळणी करणे, माहिती अधिकार, ग्रामपंचायत दप्तर तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखान्यांची तपासणी, पाणीपुरवठ्याशी संबंधित अपूर्ण कामे, निरूपयोगी साहित्य, निरुपयोगी वाहने, सर्व नोंदवह्या, विविध प्रकारच्या अपूर्ण कामांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित दौरे केले किंवा नाही, याबाबतची तपाणी करण्यात येत आहे.