लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नेहमीच चर्चेत असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचा वापर आता चक्क दारु पिण्यासाठी होत आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने विश्रामगृहात तळीरामांची चांगलीच मैफल भरत असल्याचे दिसून येत आहे.शासकीय विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून अडगळीत आहे. दुरुस्तीसाठी हालाचालीच होत नसल्याने याचा फायदा मात्र तळीरामांना चांगल्या प्रकारे होत आहे. येथे नियमित ओल्या पार्ट्या रंगत असल्याचेही समोर आले आहे. तसेच खोलीत मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास पडलेल्या स्थितीत आहेत. तर खोलीत पडलेले साहित्यही अस्ताव्यस्त स्थितीत आहे.जवळच वसाहत असल्याने येथून ये-जा करणाºयांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय परिसरात दारू पिऊन झाल्यानंतर बॉटल्या फोडल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी काचच काच पसरले आहेत. पूर्वी विश्रामगृह वापरात असल्याने परिसर स्वच्छ ठेवला जात असे. परंतु नवीन इमारतीमध्ये कारभार हलविल्यानंतर मात्र याकडे कोणी ढुंकूनही पाहण्यास तयार नाही.
शासकीय विश्रामगृह बनले तळीरामांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:02 IST