शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पैठण डाव्या कालव्यातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:20 IST

जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे

जालना/तीर्थपुरी : जायकवाडी डाव्या कालव्यातून रबी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याच्या आठ पाळ्यांना मंजुरी मिळाली आहे. बुधवारपासून हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. राजेश टोपे यांनी दिली.कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली आहे. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी नाथसागरातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याने ऊस लागवडीचा शेतक-यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.जायकवाडी पाटबंधारे अंतर्गत येणा-या पैठण नाथसागरात चांगला पाऊस झाल्याने शंभर टक्के धरण भरल्याने डाव्या कालव्याअंतर्गत मोठ्या प्रमाणात पैठण, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, पाथरी, मानवत या तालुक्यांतील कारखाना कार्यक्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. पाणी न सुटल्याने शेतक-यांनी ऊस लागवड थांबवली होती. पाणी कधी सुटणार, किती पाणी मिळणार असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा होता. अखेर मुंबई येथे कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर मुंबईत झाली. यात रबी हंगाम १५ आॅक्टोबर २०१७ ते २८ फेब्रुवारी १८ पर्यंत असतो. त्यात ऊस, गहू, ज्वारी, कापूस यासाठी पाणीपाळ्या ४ मंजूर झाल्या तर उन्हाळी हंगाम १ मार्च २०१८ ते ३० जून २०१८ पर्यंत असतो. यासाठी ४ पाणीपाळ्या मंजूर झाल्या. अशा आठ पाणीपाळ्या मंजूर झाल्या असून, ऊस लागवडीसाठी डाव्या कालव्यातून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चाºया, लघु चाºया, व सर्व्हिस रोडची दुरुस्तीकामे करून घ्यावीत, अशा सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. शेतक-यांनी रबी हंगामासाठी या पाण्याचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन आ.टोपे यांनी केले.