शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रसूलपुरा घाटात कोसळली दरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:02 IST

काटशेवरी फाटा ते जटवाडामार्गे औरंगाबाद मार्गावर रसूलपुरा घाट असून या मार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. खुलताबाद तालुक्यातील ...

काटशेवरी फाटा ते जटवाडामार्गे औरंगाबाद मार्गावर रसूलपुरा घाट असून या मार्गाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. खुलताबाद तालुक्यातील गदाणा, टाकळी राजेराय, बोडखा, धामणगाव, लोणी, घोडेगाव, गोळेगाव, सोनखेड्यासह परिसरातील ग्रामस्थांना औरंगाबादला जाणारा हा अत्यंत जवळचा रस्ता आहे. यासह सिडको, हडको, हर्सूल टी पॉइंट परिसरातील अनेक भाविक याच रस्त्याने भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येत असतात. रसूलपुरा घाटातील दरड कोसळण्याची घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु गेल्या पाच दिवसांपासून संततधार पावसामुळे घाटातील मोठी दरड रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कोसळल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता. काही दुचाकीस्वारांनी दुचाकी जाईल एवढा रस्ता मोकळा केला. त्यानंतर या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने संबंधित दगड बाजूला करत मोकळा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रसूलपुऱ्याचे सरपंच सलीम पठाण म्हणाले की, या रस्त्यावरील दरड कधीही कोसळू शकते, त्यामुळे उपाययोजना करण्यात याव्यात, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पठाण म्हणाले. दरड कोसळली तेव्हा सुदैवाने कुणीही त्या मार्गावर नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला.

-- फोटो : रसूलपुरा घाटात कोसळलेली दरड. यामुळे काही वेळ रविवारी या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

220821\img-20210822-wa0027.jpg

रसूलपरा घाटात दरड कोसळून वाहतुक खोळंबली होती.