शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी शेतकरी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:55 IST

परभणी : जिल्ह्यात विमा स्वीकारण्याचे पोर्टल बंद पडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची भेट घेवून विमा भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांना आदेश द्यावेत, तसेच मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विमा भरण्यासाठी मुदत संपत असतानाच गुरुवारी अचानक पोर्टल बंद पडल्याने शेतकºयांची धांदल उडाली़ त्यामुळे महा-ई-सेवा केंद्र आणि बँकांसमोर मोठ्या संख्येने रांगेत उभ्या असलेल्या शेतकºयांनी संताप व्यक्त केला़ दरम्यान विम्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यासाठी शेतकºयांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली़ मात्र तेथेही या कार्यकर्त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही़खरीप पीक विमा भरण्यासाठी शासनाने ३१ जुलैची मुदत दिली आहे़ राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महा-ई-सेवा केंद्रावरून शेतकºयांना विमा भरता येणार आहे़ मुदत संपत असल्याने विमा भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी झाली होती़ बँकांसह महा-ई-सेवा केंद्रांमध्ये रांगा लागल्या होत्या़ त्यातच पोर्टल बंद पडल्याने सर्व कामकाज ठप्प झाले़ त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त केला़ जिल्ह्यात विमा स्वीकारण्याचे पोर्टल बंद पडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाची भेट घेवून विमा भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील बँकांना आदेश द्यावेत, तसेच मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली़ तसेच जिल्ह्यातील वगळलेल्या सर्व मंडळांना पीक विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी जिल्हाध्यक्ष माणिक कदम, अनंत कदम, केशव अरमळ, शेख जाफर, सदाशिव साखरे, बाळासाहेब कदम, मो़ नाईकतकी, गजानन दुगाने, किशोर ढगे, विकास भोपाळे आदींची उपस्थिती होती.तांत्रिक अडचणी वाढल्याशेतकरी सभासदांचा पीक विमा भरण्याची सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे़ हा विमा शासनाच्या आॅनलाईन पोर्टलवर भरणे अनिवार्य केले असून, संकेतस्थळावरील उपलब्ध माध्यमाद्वारे भरलेली माहितीच ग्राह्य धरली जाणार आहे़ ज्या ठिकाणी इंटरनेट नाही, अशा ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आॅफलाईन युटीलिटीचा वापर करण्याच्या सूचना आहेत़ हे आॅफलाईन युटीलीटी पोर्टल बँकेच्या प्रत्येक शाखेला दिले आहे़ परंतु, त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कळविले़ या अडचणी दूर न झाल्याने विमा रक्कम भरून घेणे अडचणीचे होत आहे़ आॅफलाईन युटीलिटी पोर्टलमध्ये १० ते १२ अर्ज भरल्यानंतर पुढील सभासदांची माहिती भरताना यापूर्वीच्या सभासदांची पिकांची माहितीच जशीच्या तशी पुढील अर्जावर दिसत आहे़ त्याच प्रमाणे पोर्टलवर बचत खाते क्रमांक आठ अंकी भरण्याची सुविधा आहे़ प्रत्यक्षात बँकेच्या बचत खात्याचे क्रमांक १५ अंकी आहेत़ त्यामुळे अर्ज अपलोड होत नाहीत़ त्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहू शकतात़ तेव्हा पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच पीक विमा भरून घेतला जाईल, यासाठी बँक प्रशासन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी.जाधव यांनी सांगितले़