शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळालीच पाहिजे-चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:29 IST

भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़भोकर येथे एसबीआय बँकेच्या बाहेर जमलेल्या शेतकºयांशी त्यांनी रविवारी संवाद साधला़ दिवशी बु़ येथील मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या निवासस्थानी जाऊन खा. चव्हाण यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले़ मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर रविवारीही पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी खा. चव्हाण यांनी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ पोलीस जीपवर चढून यावेळी त्यांनी शेतकºयांना आवाहन केले़ ते म्हणाले, बँकेच्या रांगेत शेतकºयाचा मृत्यू होणे दुर्देवी घटना आहे़ अशा घटना टाळण्यासाठी शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवायला पाहिजे़राज्यभरात एकसारखीच परिस्थिती आहे़ वीजपुरवठा नाही, आॅनलाईनमध्ये अडचणी येत आहेत़ सरकारने योग्य नियोजन न करताच पीक विमा जाहीर केला़ अल्पावधीत शेतकºयांना बँकेच्या रांगेत उभे केले़ यापूर्वी अशाचप्रकारे नोटबंदी करुन जनतेला दोन महिने बँकेच्या रांगेत उभे राहायला लावले होते़ त्याहीवेळी निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला़ आताही योग्य नियोजन होत नसल्याने शेतकºयांचा बळी जात आहे़ या ठिकाणी कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नसून जनतेची गैरसोय दूर व्हावी, अशी माझी भावना आहे़ जिल्हा प्रशासन व बँक व्यवस्थापनाने पीक विमा भरण्याचे योग्य नियोजन करावे़शेतकºयांचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत़ बँकेत काऊंटर वाढवावेत़ शेतकºयांनीही संयमाने आपले अर्ज भरुन सहकार्य करावे़ यावेळी खा. चव्हाण यांनी बँक व्यवस्थापक के़एस़ कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन सूचनाही केल्या़ बँकेसमोर मोठा जनसमुदाय जमला होता़ त्यातील काही शेतकºयांनी रास्ता रोकोही केला़ त्यानंतर रांगेतील शेतकºयांनी शिस्तीने अर्ज भरल्यानंतर बँकेसमोरील गर्दी बरीच निवळली होती़