शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

मालक गावी जाताच लुटले अख्खे कापड दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:13 IST

कापड दुकान भाड्याने घेऊन त्यात सुमारे बारा ते पंधरा लाखांचा माल भरल्यानंतर मालक बहिणीच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशात जाताच सात जणांनी दुकानातील संपूर्ण सामान लुटल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कापड दुकान भाड्याने घेऊन त्यात सुमारे बारा ते पंधरा लाखांचा माल भरल्यानंतर मालक बहिणीच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशात जाताच सात जणांनी दुकानातील संपूर्ण सामान लुटल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.अश्विन ऊर्फ बंटी शिवकुमार जैस्वाल, राजकुमार ऊर्फ शिवकुमार जैस्वाल, मोहन बद्रीनारायण जैस्वाल, राजेश जैस्वाल, उमेश जैस्वाल, दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्र ारदार याकूबखान रुबाब खान (रा. मंजूरपुरा) यांनी बुढीलेन येथील एक दुकान किरायाने घेतले आणि तेथे त्यांनी कापड दुकानाचे साहित्य आणून ठेवले.बहिणीच्या लग्नासाठी २५ जून ते १५ जुलैदरम्यान त्यांना उत्तर प्रदेशात जावे लागले. गावाहून परत आल्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता त्यातील लोखंडी रॅक, काऊं टर, कागदपत्रे आणि रेडिमेड कपड्यांचा साठा चोरीला गेल्याचे समजले.आरोपींनीच हे साहित्य लुटल्याची तक्रार त्यांनी सिटीचौक पोलिसांकडे नोंदविली होती. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाच्या आदेशाने १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू के ला.विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हाऔरंगाबाद : प्रशासनाची परवानगी न घेता अमेरिकेच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.पोहेकाँ. संदेश तात्याराव कीर्तिकर यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली. युसूफखान पटेल, मोहम्मद जुबेर, मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मोहसीन खान, फय्याज खान, उमरेन चाऊस, सय्यद कलीम यांच्यासह १५ ते २० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.रिक्षाचालकास चाकूने भोसकलेजुन्या भांडणाच्या कारणावरून सय्यद राझकोद्दीन (रा. पटेलनगर, चिकलठाणा) यांना चाकूने भोसकून जखमी केल्याप्रकरणी एका जणाविरोधात क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना महावीर चौक ते क्रांतीचौक रस्त्यावर १२ डिसेंबर रोजी रात्री घडली. अश्फाक असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.