शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

500 च्या वर कार्यकर्त्यांनी घेतला कॉंग्रेसमध्ये प्रवेश

By admin | Updated: January 23, 2017 21:07 IST

भाजपच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून भाजप सहीत विविध पक्षातील 500च्या वर कार्यकर्त पदाधिकारी

 ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 23 -  भाजपच्या खोट्या आश्वासनाला कंटाळून भाजप सहीत विविध पक्षातील 500च्या वर कार्यकर्त पदाधिकारी यांनी सिल्लोड येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला.त्यात भाजपचे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पुंडलीक मोरे, उंडनगाव येथील कृष्ना उखर्ड़े यांचा समावेश आहे. सर्व प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.दि२३ सोमवार रोजी शहरातील आंबेडकर चौक येथील नविन गांधी भवन च्या प्रांगनात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने सिल्लोड सोयगाव तालुक्यातील भाजप,राष्ट्रवादी,शिवसेनेच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते.500 कार्यकर्त्यांचा प्रवेशसिल्लोड तालुक्यातील काही आजी माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटी संचालक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी जि. प.अध्यक्ष प्रभाकर पालोदकर,जि. प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी आ. कल्याण काळे,माजी आ. नितिन पाटिल,सिल्लोड चे नगराध्यक्ष अब्दुल समीर,खुलताबादचे नगराध्यक्ष कमर अहमद, फेरोज पटेल,सिल्लोड न.प. च्या उपनगराध्यक्षा शकुन्तलाबाई बंसोड़,भाऊसाहेब जगताप,जगन्नाथ खोसरे यांची प्रमुख उपस्तिथी होती.आ.अब्दुल सत्तार म्हणाले तालुक्यातील भाजपा व इतर पदाधिकाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली असून कॉंग्रेस मध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश करू नये यासाठी अयशस्विप्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आले परंतु अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन प्रवेश केला. प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात मान सन्मान करण्यात येईल.सिल्लोड सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद् व पंचायत समिती च्या कॉंग्रेस चे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन केले.सत्तार साहेब ..पुन्हा जिलाध्यक्ष व्हा....यावेळी माजी आमदार कल्याण काळे व नितिन पाटिल यांनी आ अब्दुल सत्तार यांनी जिल्हाध्यक्षांची जबाबदारी पुन्हा स्विकारावि अशी विनंती केली.यावर आमदार अब्दुल सत्तार यांनी मी कॉंग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे. दोन्ही कार्यध्यक्षांनी दिलेल्या आदेशाचे पालन होईल असे सांगितले ... यामुळे आ सत्तार पुन्हा जिल्हाध्यक्ष पद स्विकरतात का याकडे सम्पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिलाध्यक्ष पद पुन्हा स्वीकारावे का या बाबत पक्षा कडून व कार्यकर्ते आग्रह करीत आहे. मी विचार करीत आहे. योग्य वेळी निर्णय घेईन, असे आ .अब्दुल सत्तार यांनी सांगितले.अशोक चव्हाणच माझे नेते- सत्तार सत्तार म्हणाले मी हटवादी माणूस नाही फ़क्त नाराजी आहे ती कॉंग्रेस पक्षाच्या भल्यासाठी व वाढीसाठी आहे न.प.च्या निवडणुकीत जर वरिष्ट नेते प्रचारास आले असते तर जे तेरा नगरसेवक केवळ दहा मताच्या फरकाने पराभूत झाले ते तेरा नगरसेवक निवडून आले असते. व एक नगराध्यक्ष वाढला असता परंतु दुर्दैव वरिष्ट नेत्यांनी त्याची दखल घेतली नाही.अशोक चव्हाणच माझे नेते...आहे.-आ अब्दुल सत्तारजिल्हाध्यक्ष पद सोडल्यामुळे आमची धक धक वाढली - कल्याण काळेयावेळी बोलतांना माजी आमदार कल्याण काळे यांनी सांगितले आमदार अब्दुल सत्तार हे मेहनती असून पक्षासाठी रात्र दिवस झटत राहतात. आ. सत्तार यांच्यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला बळकटी मिळाली जिल्ह्यातील कन्नड़ खुलताबाद नगराध्यक्षपद कॉंग्रेसच्या पदरात पाडण्यासाहित सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले जे कोणाला जमत नाही ते सत्तार यांना जमते परंतु जेंवहापासून आ सत्तार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.तेंव्हापासूनआमची धक धक वाढली आहे असे सांगून आ सत्तार यांनी पुन्हा जिल्हाध्यक्षपादि विराजमान व्हावे अशी विनंती केली.नोटाबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना वेठीस धरण्याठी  यावेळी बोलतांना माजी जि प अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांनी राज्य व केंद्र सरकार हे बोलबच्चनाचे सरकार असून खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल या सरकाने केली आहे.सरकारने नोटाबंदिचा निर्णय शेतकऱ्यांना वेठीस धरन्यासाठी घेतला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले.सर्वसामान्यांना बैंकेत स्व्हताचा पैसा असून देखील काढता येत नाही.