शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

उदंड झाले उमेदवार

By admin | Updated: September 28, 2014 01:04 IST

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली.

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली. दिवसभरात तब्बल २०६ जणांनी आपले अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे ४८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी या सर्व अर्जांची छाननी होणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १ आॅक्टोबर आहे. राज्यात विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार, दि.२० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांत कालपर्यंत ११३ जणांचे १९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सर्व नऊ मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शनिवारी २१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपा उमेदवार मधुकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे, मनसेचे गौतम आमराव, भारिप- बहुजन महासंघाचे दीपक राऊत, रिपाइंच्या ज्योती म्हस्के आदींचा समावेश आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आज शिवसेनेच्या वतीने महापौर कला ओझा, भाजपाकडून अतुल सावे, बसपाकडून कचरू सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुबेर मोतीवाला, मनसेच्या वतीने सुमित खांबेकर यांच्यासह एकूण ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भाजपाच्या वतीने किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे एम.एम. शेख, नगरसेवक अफसर खान यांच्यासह ३० पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरले. वैजापूरमधून १२ जणांनी १९ अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेसचे दिनेश परदेशी, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, भाजपाच्या वतीने एकनाथ जाधव, मनसे कल्याण दांगोडे यांचा समावेश आहे. कन्नडमधून १३ जणांनी अर्ज दाखल केले. यात सेनेचे हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे उमेदवार नामदेव पवार आदींचा समावेश आहे. सिल्लोडमध्येही आज काँग्रेसचे अब्दुल सत्तार, भाजपाचे सुरेश बनकर, शिवसेनेचे सुनील मिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मानकर यांच्यासह २८ जणांनी अर्ज दाखल केले.गंगापूरमधून २८ जणांनी अर्ज भरले. राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील डोणगावकर, काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, शोभा खोसरे यांनी अर्ज दाखल केले. मनसेच्या बादशाह पटेल यांनीही अर्ज दाखल केला.पैठण मतदारसंघातून २७ जणांनी अर्ज भरले यात काँग्रेसचे रवींद्र काळे, शिवसेनेचे संदीपान भुमरे, भाजपातर्फे विनायक पाटील हिवाळे, रासपचे रामनाथ चोरमले यांचा समावेश आहे.फुलंब्रीतून १४ जाणांनी उमेदवारी अर्ज भरले. यात शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे आणि मनसेचे भास्कर गाडेकर यांचा समावेश आहे.उमेदवारी अर्जांचे आतापर्यंत चित्रमतदारसंघव्यक्ती अर्जसिल्लोड२८४२कन्नड२३३७फुलंब्री२३३२औरंगाबाद मध्य५०७०औरंगाबाद पश्चिम३३५२औरंगाबाद पूर्व५७८५पैठण४६६६गंगापूर३९५९वैजापूर२०३७एकूण३१९४८०