शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बाह्य रूग्ण विभागात हाल, उशिराने येतात डॉक्टर

By admin | Updated: April 8, 2017 00:22 IST

जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात डॉक्टर उशिराने येत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत.

जालना : येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात बाह्य रूग्ण विभागात डॉक्टर उशिराने येत असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. शुक्रवारी सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत स्टिंग आॅपरेशन केले असता बहुतांश विभागात डॉक्टर उपस्थित नव्हते. तर काही ठिकाणी कर्मचारी रूग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले. जिल्हा रूग्णालयात रूग्णांना अल्पदरात उपचार मिळतात. त्यामुळे गोरी-गरीब जनता सकाळीच तपासणी येते. मात्र डॉक्टर उशिराने अथवा काही वेळा येत नसल्याचे रूग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात सकाळी स्टिंग आॅपरेशन केले असता रूग्ण तासाभरापासून उपस्थित होते. मात्र डॉक्टर उपस्थित नव्हते. इतर कर्मचारीच रूग्णांची समजूत काढत असल्याचे चित्र होते. मेडिसिन म्हणून लिहिलेल्या आठ नंबर विभागात डॉक्टर नव्हते.मुख्य खुर्ची रिकामीच होती. एक महिला कर्मचारी दारावर काठी घेऊन बसलेल्या होत्या. नऊ नंबरमध्येही कोणीच नव्हते. या विभागाबाहेर पंधरा ते वीस रूग्ण उभे होते. सोनोग्राफी विभागातही डॉक्टर उपस्थित नव्हते. चार महिने रूग्ण येथे सोनोग्राफीसाठी प्रतीक्षेत होत्या. अस्थिव्यंग विभागातही कोणीच नव्हते. बाल रूग्ण विभागात डॉक्टर उपस्थित नव्हते. येथे चार ते पाच रूग्ण उपस्थित होते. असंसर्ग विभागातही डॉक्टर अथवा कर्मचारी आढळून आले नाही. सुमारे साडेदहापर्यंत अनेक रूग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा होती. इंजेक्शन, प्रेरणा प्रकल्पांत कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)