शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटीचे ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटरवर थकबाकीचा परिणाम : ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:19 IST

घाटी रुग्णालयातील ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट (टीआयसीयू) हा वॉर्डच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. येथील ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे थकबाकी असल्याने सदर कंपनी दुरुस्ती करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ तीन व्हेंटिलेटरच्या जोरावरच हे युनिट सुरूअसल्याने हा प्रकार रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट (टीआयसीयू) हा वॉर्डच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. येथील ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे थकबाकी असल्याने सदर कंपनी दुरुस्ती करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ तीन व्हेंटिलेटरच्या जोरावरच हे युनिट सुरूअसल्याने हा प्रकार रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.घाटी रुग्णालयातील यंत्रांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. देखभाल दुरुस्तीसाठी वेळीच निधी मिळत नसल्याने अनेक यंत्रसामुग्री धूळखात पडली आहे. घाटी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जातो; परंतु वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. व्हेंटिलेटरलाही नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. घाटी रुग्णालयात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या, मेंदूवरील विविध आजारांच्या उपचाराच्या दृष्टीने ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट उभारण्यात आले. या ठिकाणी ११ खाटा आहे. या खाटांनुसार या ठिकाणी ११ व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आली. घाटी रुग्णालयात दररोज येणाºया रुग्णांची विशेषत: अपघातग्रस्तांचे प्रमाण पाहता गंभीर जखमी असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हा विभाग महत्त्वपूर्ण ठरतो. उपचारामध्ये व्हेंटिलेटर महत्त्वाची भूमिका असते; परंतु आजघडीला या ठिकाणी केवळ ३ व्हेंटिलेटरच सुरूआहेत. अनेक दिवसांपासून ८ व्हेंटिलेटर बंद आहे. देखभाल-दुरुस्तीपोटी ८.६० लाख रुपये थकल्याने संबंधित कंपनीकडून दुरुस्ती टाळली जात असल्याचे समजते. व्हेंटिलेटरअभावी रुग्णाला गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे; परंतु परिस्थितीकडे घाटी प्रशासनही गांभीर्याने पाहायला तयार नाही. शिवाय निधीच नसल्याने प्रशासन कंपनीपुढे हतबल होत असल्याचे दिसते.