शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

‘बॅडपॅच’मधून बाहेर !

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड ऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़

संजय तिपाले , बीडऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़ तब्बल दोन तप ही घराणी राजकीय विजनवासात होती; परंतु यावेळी या घराण्यांचा ‘राजयोग’ आला़ प्रस्थापितांना जोराचे हादरे देत माधवराव पवार यांचे पुत्र अ‍ॅड़ लक्ष्मण पवार व भीमराव धोंडे यांनी विधानसभेत दणदणीत ‘एंट्री’ करतानाच नव्या ‘इनिंग’लाही सुरुवात केली़ धोंडे चौथ्यांदा विधानसभेत पोहचले तर अ‍ॅड़ पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात आमदारकीचा गुलाल लावला़माधवराव पवार अन् भीमराव धांडे यांचे नेतृत्व एकाचवेळी उदयाला आले़ पवार यांना वडील शाहूराव पवार यांचा राजकीय वारसा होता तर धोंडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले़ शिवाजीराव पंडित यांच्या सत्तेला सुरुंग लावत १९९० मध्ये माधवराव पवार पहिल्यांदा विधासनसभेत निवडून गेले़ पवार एस काँग्रेस तर पंडित इंदिरा काँग्रेसकडून लढले होते़ १९८५ मध्येही या दोघांमध्येच सामना झाला; परंतु पवार इंदिरा काँग्रेसचे तर पंडित एस काँगे्रसचे उमेदवार होते़ या लढतीत पंडित यांनी पवारांना चित करुन ‘हिशेब’ पूर्ण केला होता़ त्यानंतर पवार यांनी पुन्हा नशीब आजमावले़ मात्र, पंडित यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही़ नंतरच्या काळात माधवराव पवार यांना फक्त गेवराई शहरापुरतेच जखडून ठेवत पंडितांनी मतदारसंघात हुकूमत गाजवली़ अडीच वर्र्षांपूर्वी माधवराव पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी भाजपात प्रवेश केला़ दोन पंडित राष्ट्रवादीत तर एकटे पवार भाजपात असे नवे समीकरण बनले़ लोकसभा निवडणुकीत पवारांनी मतदारसंघ ढवळून काढत सराव केला होता़ काल दोन पंडितांशी एकाकी झुंज देताना अ‍ॅड़ पवार यांची कसोटी लागली होती़ पंडितांच्या एकीने झालेली ‘रिअ‍ॅक्शन’ पवारांच्या पथ्यावर पडली़ पंडितविरोधी लाट ‘कॅश’ करताना पवारांनी बदामरावांना ‘क्लिनबोल्ड’ केले़चुरशीच्या लढतीत धोंडेच ‘संघर्षनायक’!१९७८ मध्ये आष्टी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भीमराव धोंडे यांचे नेतृत्व फुलले़ १९७८ मध्ये ते अपक्ष मैदानात होते; पण त्यांचा पराभव झाला़ १९८० मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अपक्ष नशीब आजमावणारे धोंडे विजयी झाले़ पुढे १९८५, १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसकडून विधानसभावारी केली़ १९९५ मध्ये त्यांना साहेबराव दरेकर यांनी धक्का दिला होता़ १९९९, २००४ मध्ये धोंडेंची निराशा झाली़ नंतर त्यांनी भाजपाचा आश्रय घेतला़ २००९ मध्ये भाजपाने बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिली़ त्यामुळे धोंडेंनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीत उडी घेतली़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा भाजपात परतले आणि आजबेंऐवजी त्यांना संधी मिळाली़ या संधीचे सोने करत त्यांनी धस यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला़ २० वर्षांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या भीमराव धोंडे यांनी मधल्या काळात ‘बंदा’ या चित्रपटात भूमिका साकारली़ ‘आई’ मालिकेतही त्यांनी काम केले़ ‘संघर्ष’ व ‘तहान’ या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली़ राजकारणाबरोबरच अभिनयाचे अंग जपताना त्यांनी वास्तवातही मोठ्या संघर्षातून विधानसभा गाठत ‘नायक’ असल्याचे सिध्द केले़