शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नीलच्या भेदक गोलंदाजीने उस्मानाबादचा सनसनाटी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:19 IST

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जळगाव येथे शनिवारी झालेल्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील गंभिरे याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबादने पुण्याच्या देवधर ट्रस्ट संघावर ९ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. उस्मानाबादच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या स्वप्नील गंभिरे याने या सामन्यात ८0 धावांत एकूण ११ बळी घेतले. अभिषेक पवार यानेही सुरेख अर्धशतकी खेळी करताना उस्मानाबादच्या विजयात योगदान दिले.

औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जळगाव येथे शनिवारी झालेल्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील गंभिरे याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबादने पुण्याच्या देवधर ट्रस्ट संघावर ९ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.उस्मानाबादच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या स्वप्नील गंभिरे याने या सामन्यात ८0 धावांत एकूण ११ बळी घेतले. अभिषेक पवार यानेही सुरेख अर्धशतकी खेळी करताना उस्मानाबादच्या विजयात योगदान दिले.स्वप्नील गंभिरेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबाद संघाने देवधर ट्रस्टला पहिल्या डावात १६४ धावांवर रोखले. देवधर ट्रस्टकडून गौरव गणपुले याने ९७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५२, ओंकार उदावंतने ३२ व सौरभ संकलेचा याने २१ धावा केल्या. उस्मानाबादकडून स्वप्नील गंभिरे याने ५७ धावांत ४ गडी बाद केले. त्याला रघुनाथ बन, सतीश नाईकवाडी व रोहन क्षीरसागर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथदिली.त्यानंतर प्रत्युत्तरात उस्मानाबाद संघानेही दुसºया डावात १६४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून अभिषेक पवारने सर्वाधिक १७१ चेंडूंत ५ चौकारांसह ६२ धावा केल्या. सतीश नाईकवाडीने ३१ व रघुनाथ बन याने २७ धावांचे योगदान दिले. देवधर ट्रस्ट संघाकडून प्रफुल्ल महाले व इशान कुलकर्णी यांनी प्रत्येकी ३, तर गौरव गणपुलेने ७ धावांत २ गडी बाद केले. त्यानंतर सुरेख आऊट व इनिस्वंग टाकणाºया स्वप्नील गंभिरे याच्या भेदक माºयासमोर देवधर ट्रस्टचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १४.१ षटकांत ५0 धावांत कोसळला.त्यांच्याकडून सौरभ संकलेचा (१४), ओंकार उदावंत (११) व एन. जाधव (११) हे तिघेच दुहेरी आकडी धावा पार करू शकले. उस्मानाबादकडून स्वप्नील गंभिरेने २३ धावांत ७ गडी बाद केले. त्याला चैतन्य पाटीलने २७ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. त्यानंतर उस्मानाबादने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत १ गडी गमावून ५१ धावा करीत पूर्ण केले. रघुनाथ बन ३ चौकारांसह २४ व चैतन्य पाटील १८ धावांवर नाबाद राहिले. देवधरकडून कृष्णा पवारने १२ धावांत १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकदेवधर ट्रस्ट (पहिला डाव) ४८.१ षटकांत १६४. (गौरव गणपुले ५२, ओंकार उदावंत ३२, सौरभ संकलेचा २१. स्वप्नील गंभिरे ४/५७, रघुनाथ बन २/१६, सतीश नाईकवाडी २/५४, रोहन क्षीरसागर २/२६). दुसरा डाव : १४.१ षटकांत सर्वबाद ५0. (सौरभ संकलेचा १४. स्वप्नील गंभिरे ७/२३, चैतन्य पाटील ३/२७).उस्मानाबाद (पहिला डाव) : ५८.२ षटकांत सर्वबाद १६४. (अभिषेक पवार ६२, रघुनाथ बन २७, सतीश नाईकवाडी ३१. प्रफुल्ल महाले ३/३९, इशान कुलकर्णी ३/५२, गौरव गणपुले २/७). दुसरा डाव : १७.२ षटकांत १ बाद ५१. (रघुनाथ बन नाबाद २४, चैतन्य पाटील नाबाद १८. कृष्णा पवार १/१२).