उस्मानाबाद : जवखेडे (जि़अहमदनगर) येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपीतांना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन कृती समिती व सर्वपक्षीयांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांच्या विविध घोषणांनी शहर दणाणून गेले.भीमनगर येथून मोर्चा निघून संत गाडगे महाराज चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले़ उपस्थितांनी विविध मागण्या करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली़ तसेच जवखेडे हत्याकांडातील आरोपींना अटक करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा, अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पाथर्डीचे तालुका दंडाधिकारी यांना बडतर्फ करून गुन्हे दाखल करावेत, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तंटामुक्त समित्या तत्काळ बरखास्त कराव्यात, अनु़जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करून प्रभावी अंमलबजावणी करावी, हत्याकांडाबाबत सामाजिक लोकप्रतिनिधींची सत्यशोधन समिती तयार करून घटनेची सत्यता समोर आणावी, अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त जाहीर करावा, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे, अहमदनगर जिल्ह्यातील दलित अत्याचारात सहभागी असलेल्या आरोपींच्या मालमत्ता जप्त कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ या मोर्चात धनंजय शिंगाडे, माजी आ. दयानंद गायकवाड, कैलास शिंदे, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, प्रा. संजय कांबळे, सुजीत ओव्हाळ, मिलिंद रोकडे, डी़ जे़ हौसलमल, सुनिल गायकवाड, रवी माळाळे, विशाल शिंगाडे, प्रज्ञावंत ओव्हाळ, यशवंत माळाळे, सागर चव्हाण, मेसा जानराव, प्रसेनजीत सरवदे, पृथ्वीराज मस्के, सिध्दार्थ सिरसाठ, सुजित ओव्हाळ, सिध्दार्थ सोनवणे, स्वप्नील शिंगाडे, अशोक कांबळे यांच्यासह नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या़ (प्रतिनिधी)उस्मानाबाद : मराठा - मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाली आहे. सदर आरक्षण पूर्ववत ठेवावे या मागणीसाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर, वाशी शहरात बंद पाळण्यात आला़ भूममध्ये निवेदन देवून निषेध नोंदविण्यात आला़ तसेच शहरासह जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला़ जिल्ह्यात बंद काळात कोणतीही अनुचित घटना होवू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़राज्य शासनाने जुलै महिन्यात मराठा - मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणामध्ये आरक्षण लागू केले होते़ मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता़ मात्र, काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या़ न्यायालयाने मराठा - मुस्लिम आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली़ तर मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण ठेवण्याचे आदेशित केले आहे़ याच्या निषेधार्थ मराठा -मुस्लिम आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती़ उस्मानाबाद शहरात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ शहरातील व्यापाऱ्यांनी स्वत: दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला होता़ तर कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले़ मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष विजयकुमार पवार, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, डॉ़ चंद्रजित जाधव, मसुद शेख, समीयोद्दीन मशायक, धनंजय जाधव, संग्राम मुंडे, मुकुंद घाटगे, संतोष जाधव, इलियास पिरजादे, कादरखान पठाण, बिलाल तांबोळी, अयाज शेख, रवी निंबाळकर, भारत कोकाटे, बलराज रणदिवे, बालाजी साळुंके, बब्रुवान मादलापुरे, भारत इंगळे, सुरज साळुंके, अॅड़ संतोष शिंदे, मयुर काकडे, सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
आंदोलनाने उस्मानाबाद दणाणले
By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST