शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन तलाठ्यांच्या निलंबनाचे आदेश

By admin | Updated: December 15, 2015 23:42 IST

गंगाखेड : तालुक्यातील २ तलाठीे दोषी आढळल्याने निलंबन करण्यात आले असून पूर्णा तालुक्यातील एका तलाठ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

गंगाखेड : तालुक्यातील २ तलाठीे दोषी आढळल्याने निलंबन करण्यात आले असून पूर्णा तालुक्यातील एका तलाठ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या संदर्भातील आदेश नुकतेच उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी काढले आहेत. पूर्णा तालुक्यातील फुलकळस सज्जाचे तलाठी रमेश घोडके हे सतत सज्जावर अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावरून तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत तलाठी घोडके यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश १९ नोव्हेंबर २०१५ रोजी उपविभागीय अधिकारी रणवीरकर यांनी दिले होते. त्यावरून पुर्णा तहसीलदारांनी चौकशी करून अहवाल सादर केला. त्यामध्ये घोडके दोषी आढळले. त्यानुसार त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्याजवळील पदभार दुसऱ्या तलाठ्याकडे देण्याच्या सूचना रणवीरकर यांनी केल्या आहेत. दुसरे प्रकरण गंगाखेड तालुक्यातील आहे. डोंगरगाव शे. येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पुरवणी यादीत बोगस नावे टाकून ३ लाख ८८ हजार २१५ रुपयांच्या अनुदानाची रक्कम या सज्जाचे तलाठी आर.व्ही. कवठेकर यांनी उचल केल्याची तक्रार आली होती. त्यानुसार रणवीरकर यांनी या प्रकरणी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत शेतकऱ्यांच्या अनुदानात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून २८ आॅक्टोबर रोजी तलाठी कवठेकर यांच्या निलंबनाचे आदेश रणवीरकर यांनी काढले. कवठेकर यांना पूर्णा तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे. कवठेकर यांचा पदभार तहसील कार्यालयातील महा-ई सेवा केंद्रातील तलाठी डी.ए. पाटील यांच्याकडे देण्याचे आदेश काढण्यात आले. कवठेकर यांच्याकडे आंतरवेली सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. हा पदभार पाटील यांनी घेतला नाही. तसेच पाटील यांच्याकडे तहसील कार्यालयातील जमाबंदी २ चा असलेला पदभार इतरांकडे सोपविला नाही. त्यामुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन केले. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या कारणास्तव पाटील यांना ५ डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले. या संदर्भातील आदेश उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी काढले आहेत. या प्रकारामुळे तलाठ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रणवीरकर यांनी सर्व तलाठ्यांना सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्याचे आदेश दिले आहेत.