शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांना बाजू मांडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:10 IST

अंबड : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरवलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकांविषयी दहा आठवड्यांत अंतिम निर्णय देण्याचे आदेश खंठपीठाने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी अपात्र ठरवलेल्या भाजपाच्या दोन नगरसेविकांविषयी दहा आठवड्यांत अंतिम निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिले. तक्रारकर्र्त्यांना शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली. आता राज्यमंत्री अपात्र नगरसेविकांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील भाजपच्या नगरसेविका अन्साबाई तात्याबा बाबर, मुक्ता विष्णू पुंड यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रभावती सुभाष कुरेवाड व सावित्री सुरेश गुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. दोन्ही तक्रारींविषयी जिल्हाधिकारी जोंधळे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर २ जून रोजी अन्साबाई बाबर व मुक्ता पुंड यांना अपात्र ठरविले. दरम्यान, सात जून रोजी तक्रारदार प्रभावती कुरेवाड व सावित्री गुडे यांनी मंत्रालयात कॅव्हेट दाखल करुन या प्रकरणी आमची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही निर्णय देण्यात येऊ नये, अशी विनंती केली. अपात्र ठरविण्यात आलेल्या बाबर व पुंड या नगरसेविकांनी १२ जून रोजी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाविरुध्द अपील केले. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिले. प्रभावती कुरेवाड व सावित्री गुडे यांनी राज्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. याचिकेत बाबर व पुंड या दोन सदस्यांबरोबर राज्यमंत्री पाटील, नगरविकास खात्याचे सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपच्या दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर याविषयी आम्ही मंत्रालयात कॅव्हेट दाखल केले होते. कॅव्हेट दाखल केलेले असल्यामुळे नगरविकास राज्यमंत्री डॉ पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशला स्थगिती देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते. राज्यमंत्र्यांनी स्थगितीचा निकाल देताना कोणतेही कारण दिलेले नाही. तक्रारकर्ते म्हणून आम्हाला बाजू मांडण्याची संधी देणे गरजेचे होते. या सर्व बाबींचा विचार करता राज्यमंत्र्यांचा स्थगितीचा निकाल बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद तक्रारकर्त्यांचे वकील अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी न्यायालयात केला.