शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पैैसे भरल्यावर दुकानांचे सील काढण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:41 IST

थकीत भाड्याची रक्कम एक आठवड्याच्या आत भरणाºयांच्या दुकानांचे सील काढून त्यांची दुकाने खुली करावीत. तसेच दुकाने सील न केलेल्यांनी एक आठवड्यात नोटीसमधील थकीत भाड्याची रक्कम भरल्यास त्यांच्या गाळ्यांना सील ठोकू नये, असा आदेश खंडपीठाने महापालिकेला दिला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : थकीत भाड्याची रक्कम एक आठवड्याच्या आत भरणाºयांच्या दुकानांचे सील काढून त्यांची दुकाने खुली करावीत. तसेच दुकाने सील न केलेल्यांनी एक आठवड्यात नोटीसमधील थकीत भाड्याची रक्कम भरल्यास त्यांच्या गाळ्यांना सील ठोकू नये, असा आदेश न्या. शंतनू केमकर आणि न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठाने औरंगाबाद महापालिकेला दिला आहे. याचिकेची पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे अनेक वर्षांपासून अनेकांनी भरले नाही. अनेकांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. महापालिका त्यांच्यावर काही कारवाई करीत नसल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २४ नोव्हेंबर २००८ साली प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून दखल घेत (सुमोटो) याचिका दाखल करून घेतली होती. खंडपीठाने स्वत:हून दखल घेऊन नऊ वर्षे उलटली तरी भाडे भरत नसलेल्या गाळेधारकांना निष्कासित करण्यासंदर्भात काय कारवाई केली याची माहिती घेण्यासाठी खंडपीठाने १९ जुलै २०१७ रोजी सुनावणी ठेवली होती. मनपाने सादर केलेल्या शपथपत्रात कसूरदार गाळेधारकांवर कारवाई करणार याचा तपशील नव्हता. त्यामुळे या शपथपत्राआधारे कोणताही आदेश देता येत नाही म्हणून सर्व कागदपत्रांसह २१ आॅगस्ट २०१७ पर्यंत परिपूर्ण शपथपत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने १९ जुलै रोजी दिले होते. गाळेधारकांना मनपाच्या नोटिसा खंडपीठाच्या वरील निर्देशांच्या अनुषंगाने महापालिकेने ११ आॅगस्ट २०१७ रोजी शहरातील मनपाच्या सर्व (जवळपास ४००) गाळेधारकांना नोटिसा बजावून तीन दिवसांत गाळ्यांचा ताबा द्यावा, अन्यथा मनपा एकतर्फी ताबा घेईल, असे सूचित केले होते. महापालिकेने दिलेल्या नोटिसांविरुद्ध सब्जीमंडी, पैठणगेट येथील सय्यद आयतेशा सय्यद हैदर व इतर १२ गाळेधारकांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार महापालिकेने २०१२ साली अशाच प्रकारच्या नोटिसा त्यांना बजावल्या होत्या. त्याविरुद्ध दाखल केलेल्या अपिलांच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालयाने अपिलांच्या निकालापर्यंत कारवाईला स्थगिती दिली होती. जी आजपर्यंत अमलात आहे.