शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

‘नांमका’त पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:14 IST

वैजापूर : नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तब्बल एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांचा पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु होता. अखेर नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.गुरूवारी सकाळी सात वाजता कालव्यात ‘टेल टू हेड’ या धोरणानुसार पाणी आवर्तन तिन्ही तालुक्यांसाठी सोडण्यात आले.नाशिक पाटबंधारे विभागाने कालव्यात ‘ओव्हरफ्लो’ चे पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. काही शेतकऱ्यांनी थेट नाशिक येथे जाऊन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच तालुक्यातील २९ ग्रामसभेचे ठराव शेतकऱ्यांनी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याकडे दिले होते. त्यानुसार औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून पाणी सोडण्याबाबत कळवले होते. शेतकऱ्यांमधील संतापाची भावना लक्षात घेऊन नांदूर -मधमेश्वर कालवा विभागानेही पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे कालव्यातून पाणी कधी सोडले जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मंत्रालयात बुधवारी वैजापूर येथील नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. ए. पाटील, उपअभियंता प्रशांत वनगुजरे व अभियंता युसूफ पठाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सचिव डॉ. निशिकांत देशपांडे यांची भेट घेऊन तालुक्यातील खरीप क्षेत्राच्या बिकट परिस्थितीबाबत लक्ष देऊन कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे सचिव देशपांडे यांनी गुरुवारपासून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यासाठी दीड टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले. सध्या नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणात (२८.७५) टक्के पाणी साठा आहे. भावली धरणात (९६.५७) टक्के व वाकी धरणात (२४.८८) टक्के पाणी आहे. या तिन्ही धरणातून गुरुवारी सकाळी सात वाजता ३०० ते ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून साधारणपणे वीस दिवसांच्या आवर्तनातून दीड टीएमसी पाणी तिन्ही तालुक्यांना मिळणार आहे.