वैजापूर : नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणातील ओव्हरफ्लोचा पाणीसाठा वैजापूरच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला बुधवारी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी दिली.चिकटगावकर यांनी बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन वैजापूरच्या कोरड्याठाक नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या जोरामुळे पालखेड धरणात शंभर टक्के पाणी उपलब्ध झालेले आहे. ‘ओव्हरफ्लो’चे पाणी नारंगी मध्यम प्रकल्पात सोडल्यास शहरासह १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी चिकटगावकरांनी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीवर जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता एच. सी. लोखंडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले.पाणी सोडण्याची तरतूदनारंगी धरणाची निर्मिती १९९३ साली करण्यात आली. ५० टक्के पावसाच्या पाण्यावर व ५० टक्के पालखेडचे, अशी तरतूद आहे.ओव्हरफ्लोच्या पाणीसाठ्यातून प्रकल्पात पाणी साठवणूक करण्याची तरतूद प्रशासकीय मंजुरीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांना केली असल्याचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सांगितले.