शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणी समित्यांमधील रिक्त पदे सहा महिन्यांत भरण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:31 IST

राज्यातील सर्व (३१) जातपडताळणी समित्यांमधील १९१ रिक्तपदे सहा महिन्यांच्या आत भरून त्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. कंकणवाडी यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि समाजकल्याण विभागाचे सचिव यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील सर्व (३१) जातपडताळणी समित्यांमधील १९१ रिक्तपदे सहा महिन्यांच्या आत भरून त्याचा अहवाल खंडपीठात सादर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. कंकणवाडी यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि समाजकल्याण विभागाचे सचिव यांना दिला आहे.राज्यातील सर्व जातपडताळणी समित्यांमध्ये संगणकीकरण करून त्या समित्या परस्परांशी जोडण्यासाठी पावले उचला व त्याचाही अहवाल सादर करा, असेही आदेश खंडपीठाने दिले.अध्यक्षांच्या नेमणुकीची तरतूदऔरंगाबादेतील ह्युमन डेव्हलपमेंट समितीचे सचिव अमिनभाई जामगावकर यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी त्यांच्या वतीने अ‍ॅड. बी. एल. सगर किल्लारीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, जातपडताळणी समितीच्या २०१२ च्या नियमावलीमधील तरतुदीनुसार जातपडताळणी समित्यांचे अध्यक्ष म्हणून महसूल विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी (आयएएस) किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी- सिलेक्शन ग्रेड) यांच्या नेमणुकीची तरतूद केलेली आहे. मात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) हा महसूल विभागातील अधिकाºयांचा संवर्गच अस्तित्वात नाही. नियमावलीत अशा स्वरुपाच्या पदनामांचा उल्लेख करून त्याआधारे ज्येष्ठ उपजिल्हाधिकाºयांचीच समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा प्रकार राज्यात सुरू झाला आहे. सध्या ३१ समित्यांमधील १७ अध्यक्ष हे अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या संवर्गातीलच आहेत. जातपडताळणी समित्यांचे अध्यक्ष हे विभागाीय आयुक्त, किंवा जिल्हाधिकारी (आयएएस) असणे बंधनकारक आहे.उपजिल्हाधिकाºयांनी दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी उपजिल्हाधिकारीच अध्यक्ष असलेली समिती करीत आहे, ही बाब नियमाला धरून नाही, असे निदर्शनास आणून दिले असता खंडपीठाने उपजिल्हाधिकारी (निवड श्रेणी) हे पद अस्तित्वात आहे काय, त्यांचा दर्जा काय हे शपथपत्राद्वारे स्पष्ट करण्याचे निर्देश मुख्य सचिव आणि समाजकल्याणचे सचिव यांना दिले.