शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

अवैध वाळूबाबत कारवाईचे आदेश

By admin | Updated: August 19, 2016 01:03 IST

औरंगाबाद : वाळूपट्टे बंद असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते.

औरंगाबाद : वाळूपट्टे बंद असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी साठवून ठेवलेले साठे महसूल विभागाच्या मदतीने जप्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले.वाळूज परिसरातील नगर रोडवर भरधाव वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी शहर, छावणी, सिडको आणि वाळूज वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, बैठकीत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईसंदर्भात चर्चा झाली. यावेळी अधिकाऱ्यांनी औरंगाबाद आणि शेजारील जिल्ह्यातील वाळूपट्ट्यातील वाळू उत्खनन बंद आहे. असे असताना शहराच्या परिसरात वाळूचे साठे करून ठेवण्यात आलेले आहेत. या साठ्यातूनच नियमित वाळू शहरात पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा अशा प्रकारचे अवैध वाळूसाठे शोधून महसूल विभागाच्या मदतीने त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. वाळूज ते गोलवाडी फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत. त्यातून वाहनचालक रस्ता ओलांडत असतात. अशा ठिकाणीही अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे या रस्त्यावरील तुटलेल्या दुभाजकांचे सर्वेक्षण करून ते जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांसमोर दुभाजक रस्ता केलेला असतो. याबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून दुभाजक बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.