शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् विद्यार्थी, शिक्षक बालंबाल बचावले

By admin | Updated: June 24, 2017 00:35 IST

दुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली

लोकमत न्यूज नेटवर्कदुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली. सुदैवाने पत्रे उडालेतेव्हा शाळा सुटली होती. नसता अनर्थ घडला असता. या घटनेनंतर शालेय समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.याबाबत अधिक महिती अशी की, दुधड येथील जि.प. शाळेत १ ली ते ८ वी वर्ग आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षक आपापल्या घरी रवाना झाले. दरम्यान, याच वेळी आलेल्या जोरदार वादळामुळे येथील जि.प. शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडाले. त्यामुळे शाळेच्या भिंती, पत्रे, विद्युत वायर, फॅन, शालेय साहित्य याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांनी सांगितले की, ही घटना जर १० ते १५ मिनिटे आधी झाली असती तर विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठी इजा झाली असती; मात्र सुदैवाने शाळा सुटल्यानंतर सदर घटना घडल्यामुळे अनेक पालकांसह शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी झालेल्या या घटनेमुळे शिक्षकांसह, पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे गत आठवड्यातही वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या पाच वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले होते. यानंतर मुख्याध्यापक व शालेय समितीने उडालेले पत्रे दुरुस्त करून घेतले होते; मात्र गुरुवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वादळाच्या भीतीने विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नसल्याने शुक्र वारी शाळा बंद होती. दरम्यान, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी सांगितले की, एकाच आठवड्यात दोनदा शाळेचे पत्रे उडाल्यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. मागील आठवड्यात उडालेल्या पत्राच्या खोलीचा पंचनामा केलेला आहे; परंतु अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.