शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोसाठी एक इंचही जागा देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:42 IST

ग्रामस्थांनी घोषणाबाजी करीत आमच्या शिवारातील एक इंचही जागा कचरा डेपोसाठी देणार नाही, अशी भूमिका घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कदौलताबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या कचरा डेपोसाठी अब्दीमंडी येथे मनपा व महसूल विभागाच्या अधिका-यांनी रविवारी (दि.१५) पाहणी केली. ही वार्ता अब्दीमंडी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी जमा होत मनपा, महसूल प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत आमच्या शिवारातील एक इंचही जागा कचरा डेपोसाठी देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरून कच-याचा प्रश्न चांगलाच पेट घेण्याची शक्यता आहे.औरंगाबाद महापालिकेच्या कचरा डेपोला शहरातील काही भागांतून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने कचरा डेपोसाठी जागा शोधण्याच्या कामाला गती दिली आहे. रविवार असताना महापालिका व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी अब्दीमंडी परिसरातील जागेची पाहणी केली. ही माहिती काही गुराख्यांनी गावात दिली.याबाबत ग्रामस्थांनी सरपंचांना विचारले. मात्र, त्यांनाही याची माहिती नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. आमच्या गाव शिवारात कचरा डेपोसाठी एक इंचही जागा देणार नाही, अशी भूमिका घेतली. मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली.या विषयी अब्दीमंडी येथे सोमवारी (ता.१६) आपत्कालीन ग्रामसभा बोलावून यात पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. अब्दीमंडी परिसरात अनेक ऐतिहासिक दर्गाह आहेत.कचरा डेपोमुळे त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परिसरात कचरा डेपोमुळे वायुप्रदूषण होण्याची शक्यता आहे. यामुळे अब्दीमंडी परिसरात कचरा डेपो उभारण्यास विरोध असल्याचे गावक-यांनी सांगितले.