शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:02 IST

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. ...

देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करता यावी यासाठी जागतिक स्तरावरील जवळपास १६० देशांमध्ये ‘युथ डेव्हलपमेंट’ कार्यक्रम राबवणाऱ्या ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देविगरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शुक्रवारी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. ‘सेंटर फॉर युरोपियन स्टडीज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी सांगितले.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेरील देशात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून आपल्या क्षेत्रात नावीण्यपूर्ण संशोधन करून भविष्य घडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी उद्‌घाटनप्रसंगी केले. यावेळी मशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संस्थापक केरॉन वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सामंजस्य करार करण्यासाठी डॉ. गजेंद्र गंधे, प्रा. संजय कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.

विभागप्रमुख डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ.राजेश औटी, डॉ. सुनील शिंदे, प्रा. रूपेश रेब्बा, अच्युत भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.

फोटो कॅप्शन- ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी आ. सतीश चव्हाण, शेख सलीम, डॉ. उल्हास शिऊरकर, केरॉन वैष्णव, डॉ. गजेंद्र गंधे आदी.