शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बालिका विद्यालयाच्या रुपांतरास कर्मचाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: February 17, 2016 23:12 IST

परभणी : जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रुपांतर मॉडेल थ्रीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला

परभणी : जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रुपांतर मॉडेल थ्रीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्याने या निर्णयास विरोध दर्शविण्यात आला आहे़ परभणी येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कार्यरत आहे़ या शाळेमध्ये जिल्ह्यातील शाळाबाह्य, दारिद्र्य रेषेखाली आणि दुर्गम भागातून येणाऱ्या मुलींना शिक्षण दिले जात आहे़ शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरात आणि परभणी जिल्ह्यात ही शाळा कार्यरत झाली़ या शाळेंतर्गत विद्यार्थिनींच्या शिक्षणाबरोबरच निवास आणि भोजनाची व्यवस्थाही केली जाते़ शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे काम या शाळेमार्फत करण्यात येते़ शाळेत कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे़ या विद्यार्थिनी नियमित शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण या शाळेत घेत आहेत़ यासाठी विद्यालयातील शिक्षकांचे प्रयत्न कारणीभूत आहेत़ मागील अनेक वर्षांपासून शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विद्यार्थी घडविले आहेत़ परंतु, काही दिवसांपूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हे मॉडेल- ३ मध्ये रुपांरित करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली़ असा निर्णय झाल्यानंतर वर्षानुवर्षांपासून या शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे़ त्यामुळे या निर्णयास शाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे़ या शाळेत काम करणारे सर्व कर्मचारी कंत्राटी स्वरुपात काम करतात़ निर्णय झाल्यास या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे निर्णयास विरोध करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)