शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अवैध वाहतुकीवर कारवाईं

By admin | Updated: July 25, 2016 01:07 IST

औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरून कोसळलेल्या टेम्पोच्या अपघातानंतर २५ जुलैपासून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

शेताला तळ्याचे स्वरूप : राळेगाव तालुक्यात शनिवारी ५० मिमी. पाऊस राळेगाव : परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे २०० हेक्टर क्षेत्रातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याचे पाणी शिरल्याने काही शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. एकाच दिवसाच्या पावसाची नोंद ५० मिमी एवढी करण्यात आली आहे. शेताचे बांध फोडून पाणी बाहेर निघाल्याचे प्रकारही परिसरात घडले आहे. तालुक्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. थोड्याफार विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात होत आहे. परिसरातील नाले भरून वाहात आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे यात भर पडली आहे. दुपारपासून सुरू झालेला पाऊस संध्याकाळपर्यंत सुरू होता. नाल्याचे पाणी शेतात शिरले. जवळपास २०० हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. केनाडी नाल्याला आलेल्या पुरामुळे वाऱ्हा, मेंगापूर, बोरी, आष्टा, संगम या पाच गावांचा राळेगावशी संपर्क तुटला होता. पाच तास पर्यंत नाल्यावर पूर कायम राहिल्याने राळेगाव येथून आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले नागरिक अडकून पडले होते. पुराचे पाणी शिरल्याने दिलीप अराडे, कवडू राऊत, मंगला गिरी, अन्नाजी फाळके, सुरेश जुनघरे, योगेश रोकडे, पांडुरंग निवल, दिलीप उरकुडे, संजय इंगळे, सुखाराम लोहकरे, दिगांबर भूत यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पीक पाण्याखाली आल्याने उत्पन्नाची शक्यता मावळली आहे. (प्रतिनिधी) नवीन रस्त्यावरील डांबर उखडले पावसामुळे परिसराच्या अनेक भागातील रस्त्यावरील डांबर उखडले आहे. आधीच असलेल्या खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. जवळपास एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी चांगल्या भागाचा शोध घ्यावा लागतो. पुराचे पाणी असलेल्या भागातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. सध्यातरी या रस्त्याच्या दुरुस्तीची कुठलेही चिन्ह नाही. राळेगावातील प्रमुख अधिकारी बाहेरगावी पूरपरिस्थिती लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहे. शनिवारी परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली होती. परंतु विभाग आणि तालुक्याचे कुठलेही प्रमुख अधिकारी मुख्यालयी नव्हते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार हे पुणे येथे यशदाच्या मिटींगला होते, असे सांगण्यात आले. तहसीलदार हेमंत गांगुर्डे अमरावती येथे असल्याची माहिती देण्यात आली. कुठलाही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला. मंडळ अधिकारी, तलाठ्यांनाच मोर्चा सांभाळावा लागला. पंचनामा आदी कारवाई त्यांनी पार पाडली.