शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या जागा, छोटी उद्याने देणार दत्तक

By admin | Updated: April 17, 2016 01:36 IST

औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे अशक्य होते. २०१२ मध्ये मनपाने शहरातील चौक, दुभाजक दत्तक देण्याची योजना आणली होती.

औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे अशक्य होते. २०१२ मध्ये मनपाने शहरातील चौक, दुभाजक दत्तक देण्याची योजना आणली होती. या उपक्रमाला अनेक संस्था, कंपन्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आता मनपाने शहरातील छोटी-छोटी उद्याने, ले-आऊटमधील ओपन स्पेस दत्तक देण्याची योजना आणली आहे. २० एप्रिल रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हा ठराव मंजुरीसाठी ठेवला आहे.शहरात मनपाच्या मालकीचे १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. या उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कर्मचारी नाहीत. उद्यान विकसित करण्यासाठी आर्थिक तरतूदही नाही. त्याचप्रमाणे अनेक ले-आऊटमधील सोसायटीत एक किंवा दोन ओपन स्पेस आहेत. या ओपन स्पेसवर मनपाची मालकी असली तरी वॉल कम्पाऊंड उभारण्यासाठी मनपाकडे निधी नाही. सोसायटीमधील ओपन स्पेसवर अतिक्रमणे वाढत आहेत. ज्या उद्देशासाठी ओपन स्पेस आरक्षित ठेवण्यात आले आहेत, त्या उद्देशाला तडा न जाता जागा विकसित करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. शहरात ले-आऊटमधील किमान ५०० पेक्षा अधिक ओपन स्पेस पडून आहेत. विविध संस्था, बिल्डर्स, खाजगी कंपन्या यांच्या सहकार्याने उद्याने, ओपन स्पेस विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यावर ओपन स्पेस आणि उद्याने ‘सीएसआर’उपक्रमात दत्तक देण्यात येणार आहेत. ज्या कंपनीला उद्यान किंवा ओपन स्पेस देण्यात येईल तेथे कंपनीला फक्त आपला बोर्ड लावण्याची परवानगी मनपा देईल. उद्यानात तिकीट लावून पैसा कमविणे, ओपन स्पेसवर जाहिराती लावून पैसे मिळविणे आदी कामे अजिबात करता येणार नाहीत. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपन्यांना संबंधित जागा विकसित करता येईल.