शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओपन स्पेस दिला चक्क भाडेतत्त्वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:06 IST

सिंधी कॉलनी येथील सोसायटीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेली खुली जागा काही व्यक्तींनी एका केटरर्स चालकाला दरवर्षी १८ लाख रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिंधी कॉलनी येथील सोसायटीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेली खुली जागा काही व्यक्तींनी एका केटरर्स चालकाला दरवर्षी १८ लाख रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून सोसायटीतील त्रस्त नागरिक महापालिकेकडे तक्रार करीत आहेत; मात्र महापालिका प्रशासन राजकीय दबावापोटी कोणतीच कारवाई करायला तयार नाही.सिंधी कॉलनी येथील सीटीएस क्रमांक १४९५१ मध्ये १८७ प्लॉटच्या रेखांकनाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. सोसायटीने एकूण १४ एकर जागेमध्ये तीन ओपन स्पेस सोडले आहेत. त्यातील जालना रोडलगत १६ हजार चौरस फुटाचा एक ओपन स्पेस आहे. मागील अनेक वर्षांपासून सोसायटीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक या ओपन स्पेसचा वापर करीत होते. अलीकडेच सोसायटीमधील काही व्यक्तींनी ओपन स्पेसवर विना परवानगी बांधकाम केले. चार दुमजली खोल्या बांधण्यात आल्या. मैदानावर भव्य-दिव्य मंडप उभारण्यात आला आहे. ही संपूर्ण जागा गुरुकृपा केटरर्सला दरवर्षी १८ लाख रुपयांप्रमाणे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केला आहे.आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सोसायटीच्या सदस्यांनी नमूद केले की, केटरर्स चालक दररोज येथे व्यावसायिक कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ओपन स्पेस सोसायटीच्या मालकीचा असून, महापालिका केअर टेकर आहे. मागील काही दिवसांपासून ओपन स्पेसवर बांधकाम होत असतानाही महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. त्याचीही दखल प्रशासनाने घेतली नाही. आता संपूर्ण मैदान केटरर्स चालकाने व्यापून टाकले आहे. सोसायटीच्या एकाही व्यक्तीला ओपन स्पेसवर पाय ठेवण्याची मुभा नाही. स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याप्रमाणे केटरर्स चालक वागत आहे. मागील दोन महिन्यांपासून सोसायटीतील नागरिक महापालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करायला तयार नाही.