बीड : जिल्ह्यातील ३५० च्यावर गावे टंचाई च्या मार्गावर आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच हातपंप, बोअर व विहीरींची पाणीपातळी खालावून लागली आहे. उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून अडीच महिन्याचा कालावधी बाकी आहे, तोपर्यंतच टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तहसील स्तरावर येऊ लागले आहेत. गुरूवारी आष्टी तालुक्यात एक टँकर वाढले तर माजलगाव तालुक्यात एका गावचा प्रस्ताव आला आहे.११ तालुक्यातील ३५० गावांमधील पाणी पातळी खालावली आहे. आष्टी तालुक्यात ११ टँकर सुरू असून यात कडा, धानोरा, देवळाली आदी गावांचा समावेश आहे. परळी तालुक्यात सोनीहिवरा येथे एक टँकर सुरू आहे. माजलगाव तालुक्यात देखील काही गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव संबंधीत तहसीलदार यांच्याकडे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेवराई तालुक्यात पिकांसाठी पाणी नसले तरी पिण्यासाठी उपलब्ध आहे. अशी स्थिती अजून किती दिवस असेल हे सांगणे कठीण आहे, अशी माहिती गेवराई तालुक्यातील रांजणी येथील सरपंच गणेश सावंत यांनी दिली.सर्व तालुक्यातील तहसील यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. ऐनवेळी उदभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याच्या दुष्टीकोणातून जिल्हा प्रशासन सज्ज आहे. याचाच भाग म्हणजे, तहसील प्रशासनाने पाण्याच्या स्त्रोतांची पहाणी देखील सुरू आहे. (प्रतिनिधी)४ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवेल व टँकरची मागणी असेल तेथील पहाणी करून तात्काळ टँकर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.४सर्व तहसील स्तरावर स्त्रोतांची पहाणी करून ऐनवेळी गरज पडल्यास टँकरने संबंधित गावांना पाणी पुरवठा केला जाणाऱ४जिल्ह्यात बारा टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असून यामध्ये आष्टी, परळी तालुक्याचा समावेश आहे़४माजलगाव तालुक्यात एक गावचा टँकरच्या मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाला आहे़
३५० गावांत पातळी खोल
By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST