व्यंकटेश वैष्णव , बीडफेब्रुवारी महिना सुरू होताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा जिल्हयात उपलब्ध असल्याने प्रशासनासमोर जनतेला पाणी पुरवायचे कसे असा, पेच निर्माण झाला आहे. आज घडीला जिल्हयात २ टक्केच पाणीसाठा असल्याचे लाभक्षेत्र विकास प्रधिकरणाच्या अहवालानुसार समोर आले आहे.सातत्याने दुष्काळ पडत असल्याने सिंचन प्रकल्पांत गतवर्षी पाणीच साचले नाही. जिल्हयात लघु, मध्यम व मोठे असे एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. यातील बोटावर मोजण्या इतक्याच प्रकल्पांमध्ये ज्योत्याच्या खाली पाणी आहे.अशा बिकट परिस्थितीतून बीड जिल्हा जात आहे. उन्हाळ्याचे अजून चार महिने बाकी आहेत. अशा स्थितीत पिण्याचे पाणी आणायचे कोठून असा प्रश्न जिल्हा प्रशासना समोर निर्माण झाला आहे.वडवणी, अंबाजोगाई या दोन तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे भविष्यात जिल्ह्याला प्रचंड टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गावागावात पाणी पोहचविण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नागरिकांनीही पाणी जपून वापरणे आवश्यक आहे.
महिनाभर पुरेल एवढेच पाणी
By admin | Updated: February 4, 2016 00:36 IST