शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अवघी शैक्षणिक नगरी एकाच छताखाली

By admin | Updated: June 1, 2014 00:53 IST

औरंगाबाद : सर्व शैक्षणिक संस्थांची माहितीसाठी खास आपल्यासाठी ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थांची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फी भरावी लागेल, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांना भंडावून सोडत असतील. मात्र, आता आपल्या पाल्याच्या करिअरची चिंता करणे सोडा. कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थांची इत्थंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच आहे. या उपक्रमाद्वारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्‍या ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही अस्पायर एज्युकेशन फेअर; अर्थात भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ६ ते ८ जूनदरम्यान जालना रोडवरील सेन्ट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर होणार आहे. पालक असो वा पाल्य दोघांच्याही मनात करिअरसाठीच्या शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, प्रश्न असतात. त्यांचे निराकरण या प्रदर्शनात होईल. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करतील. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लँग्वेजेस, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्ण संधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येईल. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाईल. मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या नंबरवर संपर्क साधावा. या फेअरसाठी नारायणा इन्स्टिट्यूट हे प्रायोजक असून नितम (एनआयटीएचएम) हे सह प्रायोजक आहेत. १२ जिल्ह्यांत भरणार प्रदर्शन ‘लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे. भेटवस्तू देणार प्रदर्शनाला भेट देणार्‍यांपैकी एका भाग्यवंताला दर तासाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.