बीड : जिल्ह्यात ठिकठिकाणी निकृष्ट पध्दतीचे पदार्थ बाजारात विक्री केले जात आहेत़ दिवाळीच्या काळात अशा पदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असते़ या काळात अन्न औषध प्रशासन विभागाने मिठाईचे केवळ तीनच नमुने तपासणीला घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते़ मिठाई बनविताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रत्येक वर्षी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून बाहेरगावाहून येणाऱ्या खव्याची तपासणी केली जाते़ मात्र यंदा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ तीनच नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ संपूर्ण जिल्ह्यातून तपासणीसाठी केवळ तीनच नमुने घ्यावेत ही बाब संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे़ बीड, अंबाजोगाई, परळी येथून मिठाईचे तीन नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत़ दिवाळीच्या काळात केवळ काम करत असल्याचे दाखविण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे नमुने ताब्यात घेतले की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे़दरम्यान, दिवाळीनिमित्त बाजारात मोठ्या प्रमाणावर बँ्रडेड - नॉन बँ्रडेड मिठाई बाजारात विक्रीसाठी आली होती़ या मिठाईचे मानांकन काय आहे ? याची तपासणी अन्न सुरक्षा विभागाने केलेली नाही़ अन्न सुरक्षा अधिकारी कारवाई करत नसल्याने निकृष्ट दर्जाचे पदार्थ बाजारात सर्रास विक्री केले जात आहेत़ केवळ मिठाईच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, बिस्कीटे आदी वस्तू बाजारात विकण्यास येत आहेत़ अन्न व औषध प्रशासन विभागात केवळ दोनच अधिकारी असल्याचे सांगितले जात असून कारवाईसाठी चालढकल केली जात आहे़ व्यापाऱ्यांवर या विभागाचा जरब नाही़ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्षभरात फारशा कारवाया केल्या नसल्याचे समोर आले आहे़दोन वर्षापूर्वी धुळे येथून आलेला खवा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला होता़ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांची तपासणी केली जाते मात्र यंदा केवळ तीनच मिठाईचे नमुने घेतले आहेत़(प्रतिनिधी)दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तीन मिठाईचे नमुने घेतले असून त्याची तपासणी होणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांनी सांगितले़४केवळ तीन नमुने घेतल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़४गणपती उत्सवादरम्यान घेतलेल्या तीन नमुन्यांप्रकरणी खवाविके्रत्यांवार कारवाई होणार आहे़
मिठाईचे केवळ तीनच नमुने तपासणीला
By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST