वाशी : येथील तहसिल परिसरातही मंगळवारी नागरिकांचे आतानात हाल झाले. ग्रामिण भागातून आलेले अनेक नागरिक प्रमाणपत्र तसेच विविध कामासाठी कार्यालय परिसरात ताटकळत उभे होते. संपामुळे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचेही मोठे नुकसान होत असल्याचे दिसून आले. तालुक्यातील नागरिकांना तहसिलच्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. शालेय विद्यार्थ्याना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र. रहिवाशी प्रमाणपत्राची नितांत गरज आहे. मात्र तहसिलच्या कार्यालयात ना अधिकारी, ना कर्मचारी अशी अवस्था असल्यामुळे नागरिकांचे बेहाल होत आहेत. कार्यालयातील २६ जणापैकी केवळ ६ कर्मचारी मंगळवारी कामावर असल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांनाही कसले अधिकार नसल्याने कामकाज जवळपास ठप्प झाल्याचे चित्र होते. शेतकरी, मजुरांना वालीच नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बाहेरगावाहून कामानिमित्त आलेल्या नागरिकांतून व्यक्त होत होत्या. (वार्ताहर)
वाशी येथे अवघे सहाच कर्मचारी कामावर
By admin | Updated: August 6, 2014 02:31 IST