शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेनेसह राकाँकडून एकालाच ‘एबी’ फॉर्म

By admin | Updated: February 3, 2017 00:50 IST

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी १२ गट आणि २४ गणातून सुमारे ३७० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी १२ गट आणि २४ गणातून सुमारे ३७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची गुरूवारी छाननी करण्यात आली आली. छाननीदरम्यान वडगाव सिद्धेश्वर गटातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शंकर बोरकर यांनी शिवसेनेचेच अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्या यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. सुनावणीअंती तो फेटाळला. चिखली गणातून एकाच उमेदवारास शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारी (एबी फॉर्म) दिली आहे. तर बेंबळी गटातील सेनेच्या उमेदवार मिरा खापरे यांच्या अर्जामध्येही त्रुटी निघाली. उस्मानाबाद तालुक्यात जिल्हा परिषदेचे बारा गट आहेत. या गटातून १२६ उमेदवारांनी मिळून १५१ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर पंचायत समितीचे २४ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून १९३ उमेदवारांनी मिळून २१९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदरील अर्जांची छाननी प्रक्रिया तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सभागृहामध्ये पार पडली. सदरील प्रक्रियेदरम्यान वडगाव सिद्धेश्वर गटातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शंकर बोरकर यांनी शिवसेनेचेच अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. जाधव हे एका मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेचे रजिस्ट्रेशन सन २०२१ पर्यंत असून त्यांनी आजवर सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे जाधव यांचा अर्ज अवैैध ठरविण्यात यावा, असा आक्षेप नोंदविला. सुनावणीदरम्यान सदरील आक्षेपाच्या अनुषंगाने युक्तीवाद झाला असता, बोरकर यांचा आक्षेप फेटाळल्याने जाधव यांचा अर्ज वैैध ठरला. दरम्यान, एकीकडे उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवित आहेत. असे असतानाच दुसरीकडे एकाच उमेदवाराला चक्क दोन पक्षांनी ‘एबी’ फॉर्म दिल्याचे छाननीतून समोर आले. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गणातून कुसूम अर्जुन इंगळे यांना शिवसेनेकडूनही ‘एबी’ फॉर्म देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यांनाच ‘एबी’ फॉर्म दिला गेला. राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर मेडसिंगा येथील कांबळे यांचे नाव आहे. त्यामुळे आता कुसूम इंगळे या शिवसेनेची उमेदवारी घेतात की राष्ट्रवादीची हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंगळे यांनी सेनेची उमेदवारी घेतल्यास आपसूकच राष्ट्रवादीची उमेदवारी कांबळे यांच्याकडे जाईल. दरम्यान, बेंबळी गटातून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मिरा खापरे यांच्या उमेदवारी अर्जामध्येही निवडणूक विभागाने त्रुटी काढली. पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या ‘एबी’ फॉर्मवर गटाऐवजी गणाचा क्रमांक नमूद करण्यात आलेला होता. तर गणातील सेनेचे उमेदवार कमलाकर दाणे यांच्या अर्जावर गणाऐवजी गटाचा क्रमांक होता. याच त्रुटीच्या अनुषंगाने उपरोक्त उमेदवाराचा अर्ज नेमका कोणत्या जागेसाठी आहे? याचा खुलासा करावा, अशा आशयाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित पक्षाला दिले असता पक्षाने निवडणूक विभागाकडे खुलासा सादर केला. त्यामुळे खापरे यांच्यासह दाणे यांचाही उमेदवारी अर्ज वैैध ठरला. छाननीत गटासाठीचा एक तर गणासाठीचे पच अर्ज अवैैध ठरले.