शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी केवळ २५ महिलांचे अर्ज

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

शिरीष शिंदे , बीड विधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी रंगाल आली असून जिल्ह्यातील सहा मतदार संघात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असल्याची

शिरीष शिंदे , बीडविधानसभा निवडणुकीसाठीची रणधुमाळी रंगाल आली असून जिल्ह्यातील सहा मतदार संघात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे, अशी परिस्थिती राहिली तर वर्षानुवर्ष स्त्रिया राजकारणात फार काळ सक्रीय राहू शकणार नाहीत. महिलांना संसद व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतीहासिक निर्णय मार्च २०१० मध्ये घेण्यात आला. महिलांना विधान सभा निवडणुकांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला नसला तरी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सहभाग घेण्यास अनुत्सुकता दाखविली असल्याचे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात १७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी केवळ २५ महिला उमेदवार असून बहुतांश महिला या अपक्ष असल्याचे यादीवरुन स्पष्ट झाले आहे. गेवराईत २, माजलगावात ३, बीडमध्ये ४, केजमध्ये ९ तर परळीत ४ महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. २८ सप्टेंबरपासून अर्ज छाणणीला सुरुवात होणार आहे. त्यात कागदपत्र व इतर बाबींमध्ये किती महिला उमेदवारांचे अर्ज बाद ठरतील हे आताच सांगता येत नाही. त्यानंतर १ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने अपक्ष महिला अर्ज मागे घेतात हेही अद्याप स्पष्ट नाही. अर्ज दाखल केलेल्या महिलांमध्ये मुख्य लढतीत केवळ चारच महिला उमेदवार सक्षम असून त्यांची इतर उमेदवारांसह थेट लढत होईल. यामुळे इतर महिला आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या महिलांमध्ये बहुतांश महिला यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. महिलांचे निवडणुका लढण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले तर राजकारणात पुरुषांचे वर्चस्व किमान शंभर वर्षतरी कोणिही मिटवु शकणार नाहीत. ज्या महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते एकतर डमी उमेदवार किंवा मुख्य लढतीत उमेदवार असल्याचे यादीवरुन दिसुन येत आहे. त्यामुळे १ आॅक्टोबर रोजी किती महिला उमेदवार आपला अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतात हे त्या दिवशी स्पष्ट होईल. महिला राजकारणात उतरल्या नाहीत तर त्यांचे विधानसभेत आपले वजन त्यांना निर्माण करता येणार नाही. एका बाजुला महिला पन्नास टक्के आरक्षण मागत आहे. त्यांना संसंद व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षणही देण्यात आले आहे मात्र निवडणुकांमध्ये त्याचा सहभाग अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी राजकारणात आल्या तरच पुरुष-स्त्री समानता उदयाला येऊ शकेल, असा विश्वास आहे. गेवराई- पंडित गिरीका, गीता बाळराजे (अपक्ष), माजलगाव-कुंदाबाई देशमुख (अपक्ष),रेखा फड (अपक्ष), राजूबाई डोंगरे (अपक्ष), बीड- अर्चना जगताप, स्मिता धांडे (अपक्ष), कमल निंबाळकर (अपक्ष), आष्टी-मीनाक्षी पांडुळे (काँग्रेस), कमल तरटे (अपक्ष), सत्यभामा बांगर (अपक्ष), शोभा शेलार (अपक्ष), केज- नमिता मुंदडा (राकाँ), शीतल पवार (अपक्ष), अलका सरवदे (अपक्ष), संगीता तुपसागर (अपक्ष), सुनीता जगताप, कल्पना नरहिरे (शिवसेना), अंजली घाडगे (काँग्रेस), संगीता ठोंबरे (भाजप), जनाबाई वेडे (अपक्ष), परळी: पंकजा मुंडे (भाजप),कल्पना सिरसाट (अपक्ष), राजश्री मुंडे (अपक्ष), डॉ. महालक्ष्मी केदार (अपक्ष).