जालना : जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवस सर्वदूर रिपरिप पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या १४.३३ म्हणजे ९८.६१ मि.मी. पाऊस झाला.जालना जिल्ह्यात जून महिन्यात हलकासा पाऊस झाला होता. राहून-राहून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती. मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मागे राहिलेल्या पेरण्याही या काळात उरकण्यात आल्या. कपाशीची कोवळी पाने आता चार-चार पानांवर आली असल्याने त्यांना पाण्याची जास्तीची गरज आहे. मात्र गुरुवारपासून वरुणराजाने पुन्हा पाठ फिरविली असून शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९८.६१ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस परतूर तालुक्यात तालुक्यात झाला असून त्याची नोंद १५३.२६ मि.मी. एवढी झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात झाला असून त्याची नोंद ५०.७५ मि.मी. एवढी करण्यात आलेली आहे. भोकरदन तालुक्यात १४६.७९, जाफ्राबाद तालुक्यात १०९.२, अंबड ७९.४२ तर घनसावंगी तालुक्यात ६९.७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जालना तालुक्यात मात्र ११२.३९ ऐवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी २५ जुलैपर्यंत जिल्ह्यात दमदार म्हणजे ४१८.३५ मि. मी. पावसाची नोंद झालेली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४ पट पाऊस कमी झालेला असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट कमी पाऊस औरंगाबाद विभागात २०१३ च्या तुलनेत यावर्षी तीनपट पाऊस कमी पडला. २०१३ साली औरंगाबाद विभागात आजपर्यंत ५७.७४ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. तर यावर्षी आतापर्यंत १५.२७ टक्के वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस पडलेला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २०.८१ टक्के म्हणजे १४०.५३ मि. मी. तर सर्वात कमी नांदेड जिल्ह्यात ९९.०० मि. मी. म्हणजे १०.३६ टक्के पाऊस झालेला आहे. यावर्षी औरंगाबाद विभागात ३८.२९ मि. मी. पावसाची अपेक्षित नोंद असायला पाहिजे होती. मात्र, अपेक्षेपेक्षाही दीडपट पाऊस कमी झालेला आहे.आजपर्यंत झालेल्या पावसाची तुलनात्मक नोंदतालुका२०१३२०१४जालना५०१.७२११२.३९भोकरदन३६०.५९१४६.७९जाफराबाद५१९.६१०९.०२बदनापूर३१२.४६४.०६परतूर५१११५३.२६अंबड३८१.८२७९.४२घनसावंगी२५२.८८६९.०७मंठा५०७५०.७५एकूण४१८.३५९८.६१औरंगाबाद विभागातील पावसाची तुलनात्मक नोंदजिल्हा२०१४टक्केवारीऔरंगाबाद१४०.५३२०.८१जालना९८.६११४.३३परभणी१००.३५१२.९६हिंगोली१०१.८१११.०४नांदेड९९.००१०.३६बीड१११.४३१६.७२लातूर१५८.००१९.०७उस्मानाबाद१३९.१६१७.१९एकूण११८.६२१५.२७
जिल्ह्यात आतापर्यंत फक्त १४ टक्के पाऊस
By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST