शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी पोलिसांची घरपोच आॅनलाइन पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:22 IST

पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर चारित्र्य पडताळणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. कारण पोलीसच टॅब्लेट घेऊन तुमच्या घरी दाखल होतील

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर चारित्र्य पडताळणीसाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. कारण पोलीसच टॅब्लेट घेऊन तुमच्या घरी दाखल होतील आणि तुमच्यासह कुटुंबाचे छायाचित्र आणि शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून चारित्र्य पडताळणीचा गुप्त अहवाल लगेच आॅनलाइन पाठवूनही देतील. परिणामी, पासपोर्ट मिळण्याचे स्वप्न अधिक जलद गतीने साकारही होईल.याविषयी अधिक माहिती देताना औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पासपोर्टसाठी ग्रामीण भागातील नागरिक अर्ज करतात. तेव्हा त्यांना पासपोर्ट विभागाकडून पोलिसांच्या विशेष शाखेकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे पासपोर्टची फाइल जाते. तेथील पोलीस कर्मचारी संबंधित अर्जदाराला बोलावून घेत आणि कार्यवाही पूर्ण करीत. यात बराच कालावधी जात असे. बºयाचदा पासपोर्टचा अर्ज ठाण्यात आला अथवा नाही, हे पाहण्यासाठी अर्जदारांना ठाण्याला चकरा माराव्या लागत.आता नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘पोलीस तुमच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. पासपार्ट विभागाकडून संबंधितांची पडताळणीसाठी फाइल प्राप्त होताच पोलीस ठाण्याचे संबंधित कर्मचारी अर्जदाराच्या घरी टॅब्लेट घेऊन हजर होतील.तेथेच ते अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करतील. टॅब्लेटद्वारचे ते त्या कुटुंबाचे छायाचित्र घेऊन ते आॅनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करतील. यामुळे पासपोर्ट मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना टॅब्लेट देण्यात आल्याची माहिती विशेष शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी दिली.