हिंगोली : वैद्यकीय क्षेत्रात रूग्णांवर आधुनिक पद्धतीद्वारे उपचार केल्या जात आहेत. हिंगोली जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये टेलीमेडिसीनच्या सहाय्याने रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत असून २०१५-१६ यावर्षात १५३६ विविध रूग्णांवर टेलिमेडीसीनद्वारे उपचार करण्यात आले. आॅनलाईन उपचारपद्धतीमध्ये गती यावी, त्यासाठी दर सोमवारी विभागामध्ये व्हिडीओ कॉन्फरसने विविध राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा केली जात आहे. वसमत येथील टेलिमेडीसीनच्या मदतीने ६३६ तर हिंगोली येथील ९०० रूग्णांवर उपचार करण्यात आले.जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पूर्वी टेलीमेडीसनची सुविधा सुरू करण्यात आली. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या आजारांवरही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्या जात आहेत. आधुनिक पद्धतीमुळे अनेक रूग्णांना दिलासा मिळाला असून हिंगोली येथील टेलीमेडीसीन विभागातंर्गत त्वचारोग असलेल्या ५७४ रूग्णांवर उपचार करण्यात आले. तर सर्जरीच्या २२, रेडॉलॉजीच्या ४४, अर्थोपेडीक १९, एआरटी १९, युनानी ४ व मेडीसीन ११७ जणांना लाभ मिळाला आहे. तर वसमत येथील रूग्णालयात ६३६ रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सुविधेमुळे रूग्णांना फायदा होत असून डॉक्टरांनाही नेमके कुठले उपचार करावयाचे आहेत या विषयी माहिती मिळत आहे. परंतु या काम करणारे कर्मचारी मोजकेच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील कामात गती येण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे तितकेच महत्वाचे आहे.सदर सुविधा मुंबई येथील जे. जे. व नानवटे रूग्णालय तसेच पूणे, औरंगाबाद, व नागरपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत आहे. येथील तज्ञ डॉक्टरांच्या सल्याने टेलिमेडीसीनद्वारे संपर्क करून रूग्णांवर योग्य उपचार कसे केले जावेत याविषयी सल्ला दिला जातो. तसेच आवश्यक मार्गदर्शन करून रूग्णांवर उपचार केल्या जात आहेत. या सुविधेमुळे रूग्णांना बाहेर उपचरासाठी आवश्यकता नाही. तसेच त्यांचा वेळ वाचतो. शिवाय पैशाची बचत होऊन गैरसोय होत नाही.(प्रतिनिधी)
टेलीमेडिसीनद्वारे १५३६ रूग्णांवर आॅनलाईन उपचार
By admin | Updated: March 13, 2016 14:27 IST