शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन खतविक्रीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:43 IST

जिल्ह्यात आॅनलाईन खत विक्रीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ६१७ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिन देण्यात आले असून यातील ५६७ मशिनद्वारे आरंभीचा खतसाठा नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात आॅनलाईन खत विक्रीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील ६१७ खत विक्रेत्यांना ई-पॉस मशिन देण्यात आले असून यातील ५६७ मशिनद्वारे आरंभीचा खतसाठा नोंद करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.१ नोव्हेंबर २०१७ पासून खत खरेदी आॅनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात जिल्हयातील ६१७ खत विक्रेत्यांना पॉईट आॅफ सेल (पीओएस) मशीन देण्यात आल्या असून खत खरेदी करताना शेतकºयाच्या बोटाचा ठसा घेऊन आधारकार्ड नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्यानुसार शेतकºयाने बिलाची रक्कम अदा करुन खत खरेदी करायचे आहे. त्यानंतर ही नोंद पीओएस मशीनच्या माध्यमातून केंद्रीय सर्व्हरवर नोंद होणार आहे. त्यानुसारच खतांवर देण्यात येणारे अनुदान शासनाकडून संबंधित खत कंपन्यांना देण्यात येईल. त्यामुळे अनुदानाचा दुरुपयोग टाळता येणार आहे.जिल्हयात ६०९ ई-पॉस मशिन कार्यान्वीत झालेली असून त्यापैकी ५६७ मशिन द्वारे आरंभिचा खत साठा नोंद करण्यात आलेली आहे. नोंद करण्यात आलेल्या मशिनवर एकूण १३२६४ मे.टन खत साठा शिल्लक दर्शविण्यात आलेला आहे. एकूण ७६ टक्के मशिन द्वारे खत विक्री चालू आहे.रासायनिक खतांवर केंद्र शासनाकडून मोठया प्रमाणात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा दुरुपयोग टाळावा तसेच शेतकºयांना त्याचा योग्य लाभ व्हावा, यासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. किरकोळ खत विक्रेत्यांना तसेच कर्मचाºयांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पध्दतीने खताची विक्री करताना किंवा शेतकºयाने खत खरेदी करताना आधारकार्ड असणे आवश्यक आहे. कारण पीओएस मशिनवर संबंधीत शेतकºयांच्या बोटाचा ठसा घेऊन त्याचा आधारकार्ड नंबर नोंद करायचा आहे. त्यानुसार ही कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याला खताची विक्री होणार आहे. नंतर त्या शेतकºयाने खताच्या खरेदीची रक्कम अदा करायची आहे. हा प्रकल्प जिल्हयात यशस्वीरित्या राबविला जाईल या बाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.