शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

कांदा @ ६०; सर्वसामान्य त्रस्त

By admin | Updated: August 23, 2015 23:48 IST

बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला

बीड : दुष्काळामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट आले आहे. परिणामी, महागाई वाढत चालली आहे.त्यातच कांदा प्रतिकिलो ६० रूपयांवर जाऊन पोहोचला असल्याने सर्वसामान्यांच्या आठवडी बाजाराचे बजेट कोलमडले आहे. पाऊस चांगला न झाल्यामुळे नवीन कांद्याची लागवड झाली नसल्यामुळे कांदाचाळीतील कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे.बीड जिल्ह्यामध्ये नगर व राहुरी या भागातून थोड्या प्रमाणावर कांद्याची आवक होते. बाहेरील जिल्ह्यातून फारसा कांदा बीडमध्ये येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीत राखून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस येतो. यंदा पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे नवीन कांदा लागवड झाली नाही. जुनाच कांदा सध्या बाजारात दाखल होत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजारात २० ते २५ क्ंिवटल कांदा प्रतिदिन येत होता. मात्र, आता हाच कांदा प्रतिदिन ७ ते ८ टनावर जाऊन पोहोचला आहे. एवढी कमी आवक होत असल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत कांदा १५ ते २० रूपये विक्री केला जायचा. आॅगस्टच्या सुरूवातीला कांद्याचे भाव ३० रूपये होते तर आता कांदा थेट ५० ते ६० रूपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. भाववाढ झाल्यामुळे अत्यल्प प्रमाणात कांद्याची खरेदी अल्प प्रमाणात महिलांकडून होत आहे. व्यावसायिकांनीही कांद्याकडे थोडीशी डोळेझाक केली आहे. परंतु त्यांना कांदा वापरल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक वर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कांद्याच्या भावात मोठा बदल होतो. मात्र, यावर्षी आॅगस्ट महिन्यातच कांद्याचे भाव वाढलेले आहेत. नोव्हेंबर ते मार्चच्या कालावधीत नवीन कांदा लागवड होतो. त्यानंतर उत्पादित होणाऱ्या कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र, यंदा परिस्थिती बिकट आहे. जून महिन्यातही पाऊस झालेला नाही आणि सद्य स्थितीलाही पाऊस नाही. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाला तर पुढील कालावधीत नवीन कांद्याची लागवड होईल. जर पाऊस नाही झाला तर कांद्याच्या किंमती कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)गतवर्षी ज्या ठिकाणी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी कांदा लागवड झाली व त्यांनी कांदा साठवूण ठेवला. कांदाचाळीत ठेवलेला कांदा बाजारात विक्रीस दाखल होत आहे. परंतु आता बाहेर राज्य व देशातून कांदा येणार असल्यामुळे कांद्यांच्या किंमती कमी होतील, अशी शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.४जून महिन्यापासून पाऊस न पडल्यामुळे पहिले पीक हातचे गेले आहे. त्यामुळे आता याच कांद्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी जवळपास निर्भर आहेत. मात्र, त्यांची ही आशा फोल ठरते का ? हे पुढे समजेल.जुना कांदा बाजारात येत आहे. आवक घटल्यामुळे भाव वाढले आहेत. बाहेर देशातून कांद्याची आवक केली जात आहे. तसेच बाहेर राज्यातील कांदा महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे पुढील दीड महिन्याच्या कालावधीत कांद्याच्या किंमती कमी होऊ शकतात.- हाफीज बागवान, आडत व्यापारी