शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्यात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:02 IST

पाचोड : गावातील शिवाजीनगर भागात गुरुवारी रात्री मोबाईलवर लुडो गेम खेळण्याच्या कारणावरून एकाने चाकू हल्ला केल्याची घटना पुढे आली. ...

पाचोड : गावातील शिवाजीनगर भागात गुरुवारी रात्री मोबाईलवर लुडो गेम खेळण्याच्या कारणावरून एकाने चाकू हल्ला केल्याची घटना पुढे आली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पाचोड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोडच्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या लखन रामलाल परमेश्वर हा गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घरासमोरील शाळेजवळ बसला होता. यावेळी गावातील अमोल मच्छींद्र मगरे तिथे येत लखन यास म्हणाला माझ्यासोबत मोबाईलवरून पैशावर लुडो गेम खेळ. यादरम्यान लखनने अमोलला मला लुडो खेळता येत नाही तू दुसऱ्यासोबत लुडो खेळ असे उत्तर दिले. यानंतर अमोल याने लखन यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. अमोलची आई दोघांचे भांडणे सोडण्यासाठी प्रयत्न करत होती; पण अमोल ऐकत नव्हता. यानंतर थोड्याच वेळात लखनच्या आई-वडिलांनीसुद्धा भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. पण अमोल कुणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने लखनचे वडील रामलाल परमेश्वर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. तर आई विमल परमेश्वर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. वाद वाढत गेल्याने गावातील नागरिकांनी दोघांची भांडणे सोडवत या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. यावेळी सपोनि गणेश सुरवसे, पोलीस जमादार सुधाकरराव मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. जखमी रामलाल व विमल परमेश्वर यांना उपचारासाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लखन रामलाल परमेश्वरच्या फिर्यादीवरून अमोल मच्छींद्र मगरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--- फोटो