शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

चोवीस तासांत एक फुटाची वाढ

By admin | Updated: September 11, 2014 01:34 IST

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून, धरणात आवक चांगली होत असल्याने मंगळवारपासून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पैठण : जायकवाडी धरणाचा जलसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला असून, धरणात आवक चांगली होत असल्याने मंगळवारपासून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणी पातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने जायकवाडीत २२०५० क्युसेक्स क्षमतेने आवक होत आहे.गेल्या दोन दिवसांत नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस बरसला. यामुळे तेथील धरणातून सोमवारपासून विसर्ग करण्यात येत होता. मंगळवारी दुपारनंतर या विसर्गात मोठी वाढ केल्याने जायकवाडीत आवक वाढत गेली. आज बुधवार रोजी मुळा धरण- १५००, भंडारदरा- १४२१, दारणा- ७३५५, गंगापूर- २६८५, नांदूर-मधमेश्वर- १३८९१, ओझर वेअर- ४४३१, निळवंडे- ३६११ क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणात २२०५० क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे.अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. यामुळे ओझर वेअरद्वारे या धरणातून ४४३१ क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण ९५.२४ टक्के, गंगापूर- ९३.४६ टक्के, करंजवन- ८९.८९ टक्के व पालखेड- १०० टक्के भरलेले आहे व पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी या धरणात येत असल्याने या धरणातून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १३८९१ क्युसेक्सने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.