शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील महिलेच्या खून प्रकरणात एकास अटक

By admin | Updated: March 20, 2016 23:38 IST

परभणी : मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करताना रेल्वेतील एका महिलेचा ८ नोव्हेंबर २०१५ रोजी परभणी-पूर्णा रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे खून झाला होता़

परभणी : मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करताना रेल्वेतील एका महिलेचा ८ नोव्हेंबर २०१५ रोजी परभणी-पूर्णा रेल्वे मार्गावरील पिंगळी येथे खून झाला होता़ या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी १९ मार्च रोजी पुणे येथून एका आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव बेसले यांनी दिली़ हिंगोली तहसील कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या सविता मल्लिकार्जुन कापसे (वय ३३) या अकोला-परळी रेल्वेने ८ नोव्हेंबर रोजी भाऊ प्रभू पाटील व ११ महिन्यांच्या मुलासोबत परळीला निघाल्या होत्या़ पिंगळी स्थानकावर रात्री ८़५० च्या सुमारास दोन चोरट्यांनी रेल्वे डब्यात शिरून सविता कापसे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला़ या घटनेत झालेल्या मारहाणीत सविता कापसे यांना चाकू लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या घटनेचा तपास चार ते पाच महिने लागला नव्हता़ १५ मार्च रोजी रेल्वेचे पोलिस निरीक्षक वासुदेव बेसले यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला़ अवघ्या चार दिवसांत पोलिस निरीक्षक बेसले यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला़ घटनेतील आरोपी परभणी येथील रहिवासी असून, तो पुणे येथे एका खानावळीत काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच १९ मार्च रोजी पोलिसांनी सुनील खंदारे (वय २४) यास ताब्यात घेतले़ सुनील खंदारे यास सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे़ खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी रेल्वे पोलिस विभागाचे पोलिस अधीक्षक राजीव जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला़ (प्रतिनिधी)