शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्याची वाहतूक पोलिसांना धमकी

By admin | Updated: July 26, 2016 00:13 IST

औरंगाबाद : आपण मोठे अधिकारी आहोत, वाहतूक पोलीस हा आपल्यासमोर किरकोळ माणूस आहे, अशा आविर्भावात भरचौकात वाहन अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाला वनखात्याच्या अधिकारी आणि त्यांच्या चालकाने शिवीगाळ

औरंगाबाद : आपण मोठे अधिकारी आहोत, वाहतूक पोलीस हा आपल्यासमोर किरकोळ माणूस आहे, अशा आविर्भावात भरचौकात वाहन अडविणाऱ्या वाहतूक पोलिसाला वनखात्याच्या अधिकारी आणि त्यांच्या चालकाने शिवीगाळ करून झटापट केल्याने खळबळ उडाली आहे. बसस्थानक रोडवरील कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नलवर सोमवारी दुपारी १२.२५ वाजेच्या सुमारास ही घटना झाली. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह त्याच्या वाहनचालकास अटक झाली आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी लिमचंद राठोड (५७, रा. समर्थनगर) आणि चालक अनिल चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण धोटे आणि हवालदार कल्याण हिवाळे हे सोमवारी सकाळी कार्तिकी हॉटेल वाहतूक सिग्नल येथे कामावर होते. यावेळी महावीर चौकाकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ जीप (क्रमांक एमएच-१९ बीजे ५८४५) चालकाने सिग्नल तोडून चौकातच वाहन उभे केले. त्यामुळे पोकॉ. धोटे यांनी चालक चव्हाण यास पावती घेण्यास सांगितले. त्यावेळी जीपमध्ये अधिकारी राठोड बसलेले होते. त्यांनी गाडीतूनच धोटे यांना उद्देशून ‘तू बाजूला सरक’ असे म्हणून शिवीगाळ केली. धोटे यांनी राठोड यांना खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा राठोड यांनी दोन्ही पोलिसांना अर्वाच्य भाषेत ‘तिकडे चोर चालले व तुम्ही आम्हाला काय पकडता? मी एक रुपयाचा दंड न भरता तुम्हा दोघांना ऊठबशा मारायला लावतो. मी मोठा अधिकारी असून, तुम्हा दोघांना बघून घेतो, तुमचे नाव व नंबर सांगा, तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी धमकी दिली. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण कक्षाला कळविली. याठिकाणी नागरिकांची गर्दी जमली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बिरारी हे अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पो.कॉ.धोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राठोड आणि चव्हाण यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व झटापट करून जिवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली आणि मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड आणि चालक चव्हाण यांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.