शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतातील सामाईक बांधाच्या वादातून एकाची हत्या; पाचजणांविरोधात गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 19:17 IST

गेल्या काही दिवसांपासून सामाईक बांधावरून वाद सुरू होता

वैजापूर (औरंगाबाद ) : शेतातील बांधावर वळण टाकल्याच्या कारणावरून  छातीत लाथाबुक्क्याने मारहाण करून एकाला ठार मारल्याची घटना तालुक्यातील डागपिंपळगाव येथे सोमवारी (दि. २४ ) सायंकाळी घडली. या प्रकरणी मृताच्या दोन साडूसह पाच जणाविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून एकाला औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अशोक बाबूराव डांगे (५६) असे या घटनेतील मयत इसमाचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक डांगे यांची डागपिंपळगाव शिवारात गट नंबर १०२ मध्ये शेती आहे. त्यांचे दोन साडूही डागपिंपळगाव येथेच राहत असून डांगे व त्यांच्या शेताचा सामाईक बांध आहे. गेल्या काही दिवसापासून सामाईक बांधावरून त्यांचा वाद सुरू आहे. सोमवारी अशोक डांगे यांचा मुलगा अंकूश हा बांधावर माती टाकत होता. या कारणावरून अंकूश याचे लोहकणे व माकोडे हे दोन्ही काका व तीन मावस भाऊ डांगे यांच्या घरी आले. बांधावर माती का टाकली असे म्हणून त्यांनी अंकूश डांगे व त्यांचा भाऊ रविंद्र डांगे यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांचे वडील अशोक डांगे यांना धरून त्यांच्या छातीत लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. 

या मारहाणीत अशोक हे जागेवर बेशुद्ध झाले.त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषीत केले. जखमी रविंद्र डांगे याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अंकूश अशोक डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब लोहकणे व अशोक बारकू माकूडे, मच्छींद्र भाऊसाहेब लोहकणे, पंकज भाऊसाहेब लोहकणे व प्रदीप अशोक माकूडे ( सर्व रा .डागपिंपळगाव)  या पाच जणांविरोधात विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश बोऱ्हाडे हे करीत आहेत.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आरती बनसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.