शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अपघातात एक ठार,चौघे गंभीर

By admin | Updated: January 11, 2015 00:55 IST

नळदुर्ग : भरधाव वेगातील ट्रकने टमटमसह ट्रकला समोरून जोराची धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला़ तर इतर चौघे गंभीर जखमी झाले़

नळदुर्ग : भरधाव वेगातील ट्रकने टमटमसह ट्रकला समोरून जोराची धडक दिल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला़ तर इतर चौघे गंभीर जखमी झाले़ हा अपघात शनिवारी सकाळी पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग नजीकच्या बालाघाट महाविद्यालयासमोर घडला़ पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, इटकळ येथून टमटम (क्ऱएम़एच़२३- एक्स १४२८) शनिवारी सकाळी प्रवाशी घेवून नळदुर्गकडे येत होता़ सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील नळदुर्गनजीकच्या बालाघाट महाविद्यालयानजीक तो टमटम प्रवाशी उतरविण्यासाठी थांबला होता़ त्यावेळी हैद्राबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्ऱएम़एच़४६- एस़२९०८) ने टमटमला समोरून जोराची धडक दिली़ टमटमला धडक देवून पुढे गेलेल्या ट्रकने सोलापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या (क्रक़े़ए़५६- ७३३) ला पाठीमागून जोराची धडक दिली़ या विचित्र अपघातात टमटममधील बाबूराव मारूती जाधव (वय-६०), नागनाथ कदम (दोघे रा़ शिरगापूर), भोजू गोपा चव्हाण, संगिता भोजू चव्हाण (दोघे रा़ धनगरवाडी) व महंमदअली इस्माईल सैला (रा़नळदुर्ग) हे गंभीर जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी रूग्णालयाकडे नेण्यात येत असताना बाबूराव मारूती जाधव यांचा मृत्यू झाला़ जखमींवर नळदुर्ग येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरकडे पाठविण्यात आले आहे़ घटनेची माहिती मिळताच महामार्गचे सपोउपनि मोरे, नळदुर्ग ठाण्याचे हेकॉ शिंदे, तांबोळी, कृष्णा राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मदत केली़ तसेच वाहतूक सुरळीत करण्याकामी प्रयत्न केले़ दोन्ही वाहनांना धडक देणाऱ्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ सदरील घटनेचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)