शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:56 IST

दगडफेक करून धावती कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात कारमधील एक जण जागीच ठार, तर कारचालक गंभीर जखमी झाला. जवळपास दीड लाखाचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री औरंगाबाद-बीड महामार्गावरील दाभरूळ-थापटीतांडा शिवारात घडली. दरम्यान, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड/आडूळ : दगडफेक करून धावती कार थांबताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात कारमधील एक जण जागीच ठार, तर कारचालक गंभीर जखमी झाला. जवळपास दीड लाखाचा ऐवज लुटून दरोडेखोरांनी पोबारा केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री औरंगाबाद-बीड महामार्गावरील दाभरूळ-थापटीतांडा शिवारात घडली. दरम्यान, पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपास सुरू केला आहे.सिद्धलिंग रामलिंग कोरे (५५, रा. म्हातारगाव, ता. धारूर, जि.बीड, ह.मु. औरंगाबाद) असे मृताचे नाव असून, गंभीर जखमी झालेले कारचालक सुनील प्रभाकर सुरडकर (३७, रा. जाधववाडी, औरंगाबाद) यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी सांगितले की, एम.बी. पाटील कन्ट्रक्शनचे साईट इन्चार्ज सिद्धलिंग कोरे हे कारने (क्र. एमएच-१२-एचएल -३२५६) परळी येथून सोमवारी रात्री नातेवाईकाकडील लग्न समारंभ आटोपून औरंगाबादला येत होते. सुनील हे कार चालवत होते. दाभरूळ-थापटी तांडा शिवारात कार आली असता महामार्गाच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून त्यांच्या कारवर अचानक दगडफेक सुरू झाली.चालकाने कार थांबवताच बाजूला दबा धरून बसलेल्या २० ते २५ वयोगटातील अंगात काळ्या रंगाचे फूल शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेल्या तीन-चार दरोडेखोरांनी या दोघांना बेदम मारहाण सुरू केली. कोरे यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, ५० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल व नगदी १५०० रुपये, तसेच कारचालक सुरडकर यांच्याजवळील १६ हजारांचे दोन मोबाईल मनगटी घड्याळ, रोख ४०० रुपये, असा एकूण एक लाख ३४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. छातीत व डाव्या पायावर चाकूने खोल वार केल्यामुळे कोरे रक्तबंबाळ होऊन जागीच गतप्राण झाले. यावेळी प्रतिकार करणाºया कारचालकाच्या उजव्या पायावरही दरोडेखोरांनी जबर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.पाचोड पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू हस्तगत करून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३०२, ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.मंगळवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. आरतीसिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, ‘स्थागुशा’चे पो.नि. सुभाष भुजंग, उपनिरीक्षक विवेक जाधव, जफर पठाण, बाळू पाथ्रीकर, गणेश जाधव, संजय भोसले, राहुल पगारे, गणेश गांगवे, रमेश सोनवणे यांच्यासह ठसे तज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.महामार्गावर पोलिसांकडून नाकाबंदीगंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कारचालकाने त्याच कारमध्ये मयत सिद्धलिंग कोरे यांना टाकून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात आणले व घटनेची माहिती पाचोड पोलिसांना दिली. लगेच मध्यरात्री पाचोडचे सपोनि. महेश आंधळे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, प्रदीप एकसिंगे, सहायक फौजदार कल्याण राठोड, नरेश अंधारे, प्रमोद फोलाने, शिवाजी जाधव, तात्यासाहेब गोपालघरे, रामदास राख आदींनी घटनास्थळी धाव घेऊन राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी केली. सिद्धलिंग कोरे यांच्यावर परळी येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.मारहाण पाहूनही वाहने सुसाट; जखमी अवस्थेत २० मिनिटांत गाठले रुग्णालयऔरंगाबाद : रात्रीची दहाची वेळ, रस्त्याने ये-जा करणाºया वाहनांची चांगली वर्दळ, त्यामुळे मदतीसाठी कोणीतरी धावून येईल, असे वाटले; परंतु मारहाण होताना पाहून वाहन थांबविण्याकडे दुर्लक्ष करून अनेक जण निघून गेले. एका वाहनचालकाने धाडस दाखविले; परंतु हल्लेखोराने धमकाविल्यानंतर तोही मुकाट्याने निघून गेल्याचे जखमी चालक सुनील सुरडकर यांनी सांगितले. सुनील सुरडकर यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. हल्लेखोराच्या मारहाणीत सिद्धलिंग कोरे गंभीर जखमी झाले होते. माझ्या पायावरही चाकूने हल्ला झाला; परंतु त्याच्यावर लवकर उपचार व्हावे म्हणून जवळपास २० ते २५ कि.मी.चे अंतर २० मिनिटांत कापले आणि जालना रोडवरील एका रुग्णालयात गेलो. अर्ध्या अंतरापर्यंत कोरे हे शुद्धीवर होते. रुग्णालय येईपर्यंत त्यांच्या जखमेतून रक्त वाहू नये, यासाठी बराच प्रयत्न केला. या रुग्णालयातील डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. काहीतरी वाईट झाल्याची कल्पना आली होती. त्यामुळे घाटीत आलो. कोरे यांचा जीव वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचे सुनील सुरडकर यांनी सांगितले.वार चुकविल्याने मांडीवर जखमहल्लेखोराने माझ्याही पोटाच्या दिशेने चाकूचा वार केला; परंतु हा वार चुकविला. हा वार मांडीवर लागला. घटनेच्या वेळी मोबाईल कुठेतरी पडला. त्यामुळे मदतीसाठी कोणाची मदत घेण्याऐवजी रुग्णालयात गेल्याचे सुनील सुरडकर यांनी सांगितले.