लोहारा : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत़ जखमींना उमरगा, उस्मानाबाद व सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ हे अपघात मंगळवारी दिवसभराच्या कालावधीत जेवळी, धानुरीपाटी (ता़ लोहारा) येथे घडले असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील जेवळी- आष्टामोड मार्गावरील जेवळी येथील शासकीय रूग्णालयाजवळ मंगळवारी सकाळी टमटमला (क्ऱएम़एच़२५- एऩ ५७२) जीपने (क्ऱएम़एच़२५- आऱ ६१३०) पाठीमागून जोराची धडक दिली़ या भीषण अपघातात टमटम पलटी होवून प्रवाशी विकास घोडके हे गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी उमरगा येथे नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत टमटम चालक रमेश बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीपचालकाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ लोहारा- माकणी मार्गावरील धानुरी पाटीजवळील वनीकरण परिसरात कार (क्ऱएम़एच़२५- आऱ ०८१८) व दुचाकीची (क्ऱएम़एच़२४- ए़ जे़ ६५०४) मंगळवारी दुपारी समोरासमोर जोराची धडक झाली़ या अपघातात दुचाकीवरील आकाश पवार (वय-१६) व प्रकाश राठोड (वय-३०) हे दोघे गंभीर जखमी झाले़ जखमींवर लोहारा येथील ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते़ दरम्यान, सदरील अपघात प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लोहारा ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. (वार्ताहर)
अपघातात एक ठार, दोघेजण जखमी
By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST